ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.  लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतग्रस्त असून इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळणार नसल्याचं रोहित शर्मानं स्पष्ट केलंय. तसेच विराट ऐवजी श्रेयस अय्यर भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, अशीही माहिती रोहितनं दिली आहे. महत्वाचं म्हणजे, विराटच्या दुखापतीबाबत पुरेशी माहिती समोर आली नसून पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट वैकल्पिक सरावासाठीही आला नव्हता. 


इंग्लंडविरुद्ध रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात विराटच्या मांडीला दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी हवाल्यानं एएनआयनं दिली होती. विराटला दुखापत क्षेत्ररक्षणादरम्यान किंवा फलंदाजी करताना झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. विराट कोहली अजूनही दुखापतून सावरला नसल्यानं त्याला इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आलीय. मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे विराट कोहली आजचा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. 


एएनआयचं ट्वीट-



विराटचं खराब प्रदर्शन
इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यातही विराट मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला होता. या कसोटीत सामन्यात तो अनुक्रमे 11 आणि 20 धावा करू शकला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याची खराब कामगिरी सुरूच राहिली. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात विराटला फक्त 12 धावाच करता आल्या. तसेच, कोहलीसाठी आयपीएल 2022 देखील काही खास राहिला नाही, ज्यामध्ये तो 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीनं आणि 115.98 च्या स्ट्राइक रेटनं केवळ 341 धावा करू शकला. यादरम्यान त्याला फक्त दोन अर्धशतक झळकावता आली.


हे देखील वाचा-