IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेत इंग्लंडला 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर कब्जा करण्यासाठी असेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडशी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माकडं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे.  परदेशी भूमिवर एकाच देशात सर्वाधिक शतक ठोकण्याचा पराक्रमापासून रोहित शर्मा एक शतक दूर आहे. 

दरम्यान, सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स आणि सईद अन्वर यांनी परदेशी भूमीवर एकाच देशात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम केलाय. तर, रोहित शर्माही सात शतकांसह या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करून दाखवली आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मानं आणखी एक शतक ठोकल्यास तो परदेशी भूमीवर सर्वाधिक शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरेल.

परदेशी भूमीवर एकाच देशात सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज-

फलंदाज विरुद्ध संघ शतक
एबी डिव्हिलियर्स भारत 7
सचिन तेंडुलकर यूएई 7
रोहित शर्मा इंग्लंड 7
सईद अनवर संयुक्त अरब अमीरात 7

 

भारतीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, इशान किशन , प्रसिद्ध कृष्णा , मोहम्मद सिराज , अर्शदीप सिंह.

हे देखील वाचा-