Eng vs Ind 4th Test Day 3 : चौथ्या कसोटीत इंग्लंडचा वरचष्मा, तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले, इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी

India Vs England 4th Test Update : तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे. भारताला जिंकायचं असेल, तर गोलंदाजांनी कंबर कसावी लागणार आहे.

किरण महानवर Last Updated: 25 Jul 2025 11:11 PM

पार्श्वभूमी

India Vs England 4th Test Day 3 Live Score : मँचेस्टर कसोटीमध्ये इंग्लंडने चांगली पकड निर्माण केली आहे. भारताचा पहिला डाव 358 धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात...More

चौथ्या कसोटीत इंग्लंडचा वरचष्मा, घेतली 186 धावांची आघाडी

मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 7 विकेट गमावून 544 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांपर्यंत मर्यादित राहिल्याने इंग्लंडची पहिल्या डावात एकूण आघाडी 186 धावांपर्यंत वाढली आहे. तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स 77 धावा करून खेळत आहे, त्याच्यासोबत लियाम डॉसन देखील क्रीजवर खंबीरपणे उभा आहे.