Eng vs Ind 4th Test Day 2 : 'योद्धा' बनला ऋषभ पंत, नंतर डकेट आणि क्रॉलीच्या बॅटने ओकली आग, दोघांचेही शतक हुकले; दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?

Eng vs Ind 4th Test Day 2 Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज गुरुवार 24 जुलै रोजी दुसरा दिवस आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 24 Jul 2025 11:16 PM

पार्श्वभूमी

England vs India 4th Test Day 2 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज गुरुवार 24 जुलै रोजी दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीचा...More

'योद्धा' बनला ऋषभ पंत, नंतर डकेट आणि क्रॉलीच्या बॅटने ओकली आग, दोघांचेही शतक हुकले; दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा आज दुसरा दिवस होता. गुरुवारच्या खेळाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात दोन विकेट गमावून 225 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा ऑली पोप 20 धावांसह आणि जो रूट 11 धावांसह खेळत होते. सध्या इंग्लंड भारतापेक्षा 133 धावांनी मागे आहे. त्याआधी भारताचा डाव 358 धावांवर आटोपला.


पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही ऋषभ पंत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, जो पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही फलंदाजीला आला होता. अंशुल कंबोजनेही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे.


© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.