India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज तिसरा टी20 (3rd T20) सामना खेळवला जाणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना (2nd T20) शनिवारी जिंकत भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देईल. तर इंग्लंड सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 10 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
इंग्लंडविरुद्ध भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक
हे देखील वाचा-
- Rohit Sharma : कर्णधार रोहितने आणखी एक रेकॉर्ड केला नावावर, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
- Watch : हॉकी विश्वचषक सामन्यादरम्यान महिला खेळाडूची बॉयफ्रेंडला किस, भर मैदानात केलं प्रपोज, पाहा VIDEO
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक