Kamalpreet Kaur Banned: भारताची डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आलीय. दरम्यान, 26 वर्षीय कमलप्रीत कौरनं स्टॅनोझोलॉल (Stanozolol) या प्रतिबंधित औषधाचा वापर केल्यामुळं तिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनं (Athletics Integrity Unit) ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. कमलप्रीत कौरवरील बंदी 29 मार्च 2022 पासून लागू होईल.


ट्वीट-






 


अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या अहवालात काय लिहिलंय?
अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, 7 मार्च 2022 रोजी कमलप्रीतचा पटियाला येथे नमुना घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आला. नमुन्यात स्टॅनोझोलॉल नावाचा प्रतिबंधित औषध आढळलं. तिनं फेब्रुवारी 2022 मध्ये एका प्रोटीन सप्लिमेंटमध्ये दोन चमचे प्रतिबंधित औषध स्टॅनोझोलॉलचं सेवन केल्याचं आढळून आलं. कमलप्रीत कौरनं 27 सप्टेंबर 2022 रोजी डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचं मान्य केलं. आपली चूक मान्य करण्यासाठी तिला एका वर्षाची मुदत देण्यात आली होती. 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमलप्रीत कौरची ऐतिहासिक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला. या स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोअर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी पहिली खेळाडू आहे ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर स्कोअर केला. पहिल्या प्रयत्नात तिनं  60.25 मीटर   स्कोअर करण्यात यशस्वी ठरली होती.


शेतकरी कुटुंबियातील मुलगी
मुक्तसरमधील काबरवाला गावात राहणारी कमलप्रीत ही शेतकरी कुटुंबातील आहे. सध्या ती रेल्वेत नोकरी करते.त्‍याच्‍या गावाजवळील बादल गावात साई केंद्र असून 2014 ते गतवर्षी ती तेथे प्रशिक्षण घेत होती. त्याची प्रशिक्षक राखी त्यागीच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळं सर्व स्पर्धा थांबल्या होत्या. त्यामुळं कमलप्रीतला खूप वाईट वाटलं होतं. तसेच कमलप्रीत ऑलिम्पिकमध्ये नक्कीच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. 


हे देखील वाचा-