Deepika Padukone IPL Bid : आगामी आयपीएल स्पर्धेत आणखी दोन संघ पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच बोली लागणार आहे. आयपीएल संघ विकत घेण्यासाठी उद्योगपती, व्यापसायिक, कलाकार यांच्यासह विदेशातील काही कंपन्यांनी रस दाखवला आहे. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडमधील स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह (Deepika Padukone and Ranveer Singh) आयपीएल संघ विकत घेण्याच्या तयारीत आहेत. कोलकाता नाइट राइडर्स(KKR) संघाचा अष्टपैलू खेळाडू दिनेश कार्तिक याने सोशल मीडियावर एका पोस्टवर विनोदी पोस्ट केली आहे. यामध्ये तो म्हणतो की, रणवीरच्या संघाची जर्सी खूप मजेदार असेल. कारण तो आपल्या ड्रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे.













दोन नव्या आयपीएल संघामुळे बीसीसीआय मालामाल होणार आहे. बीसीसीआयच्या खात्यात जवळपास 5000 कोटी रुपये जमा होतील. आयपीएल सध्या आठ संघामध्ये खेळलं जातं. आता पुढील वर्षांपासून दहा संघामध्ये आयपीएलची स्पर्धा रंगणार आहे. दोन नवीन संघाची भर पडल्यामुळे सामन्यामध्येही वाढ होऊ शकते. पुढील हंगामात 74 सामने खेळले जातील. 


कोणती शहरं आहेत स्पर्धेत?


जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असणारं अहमदाबाद सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याशिवाय पुणे आणि लखनौ या शहरांचाही समावेश आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एका स्टेडियमची  निवड होऊ शकते कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे.


मँचेस्टेर युनायडेट खरेदी करणार आयपीएलचा संघ?


मँचेस्टर क्लबने बीसीसीआयकडून टेंडर खरेदी करण्याची कागदपत्रे घेतली आहेत. एका खासगी कंपनीद्वारे मँचेस्टर क्लबने बीसीसीआयकडून कागदपत्रे घेतली आहेत. आयपीएलमधील संघ विकत घेण्यास मँचेस्टर युनायटेड उत्सुक आहे. मँचेस्टर युनायडेट क्लब जगात नावाजलेला क्लब आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या संघाच्या लिलावावेळी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 300 कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांनाच या लिलावात सहभागी होता येईल. बीसीसीआयने नव्या संघाच्या टेंडरबाबातची तारीख वाढवली होती. 20 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवली होती. आता 25 ऑक्टोबर रोजी बीसीसीआय दोन नव्या संघाची घोषणा करणार आहे.