Dean Elgar On Virat Kohli: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG Test Series) खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तीन सामने शिल्लक आहेत. टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहलीनं (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. या मालिकेतील तो एकही सामना खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या (BCCI) वतीनं देण्यात आली आहे. अशातच विराट कोहलीबाबत एका दिग्गज खेळाडूनं केलेल्या वक्तव्यामुळे सध्या मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
टीम इंडियाची रनमशीन असलेल्या विराट कोहलीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधारानं केलेल्या आरोपानं क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरनं (Dean Elgar) विराट कोहलीवर अत्यंत घृणास्पद आरोप केला आहे. "एका सामन्यात विराट कोहली माझ्यावर थुंकला होता.", असा आरोप डीन एल्गरनं केला आहे.
डीन एल्गर नेमकं काय म्हणाला?
डीन एल्गरनं 2015 मधला एक किस्सा सांगताना कोहलीवर गंभीर आरोप केला आहे. 2015 मधल्या एका सामन्यात विराट कोहली रागानं माझ्यावर थुंकला होता. त्यानंतर आमच्यात वादही झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्यानं डीन एल्गरनं सांगितलं की, "जेव्हा मी बॅटिंगसाठी मैदानात आलेलो, तेव्हा असं वाटलं की, अश्विन आणि जाडेजासमोर स्वतःचा बचाव करत होतो, तेवढ्यात विराट कोहली आला आणि माझ्यावर थुंकला. त्याच्या या कृत्त्याला उत्तर म्हणून मी त्याला शिव्या घातल्या."
दरम्यान, एल्गरनं आणखी एका गोष्टीचाही खुलासा केला की, हा वाद झाल्यानंतर विराट कोहलीनं त्याची माफीही मागितली होती. जेव्हा 2017-2018 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, त्यावेळी विराट कोहलीनं एल्गरची माफी मागितली होती.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीचं कारण काय?
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीला कोहलीनं भारतीय कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, देशाचं प्रतिनिधित्व करणं, हे नेहमीच आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे विराट इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकणार नाही. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. जय शाह म्हणाले होते की, बीसीसीआय त्यांच्या निर्णयाचा आदर करते आणि बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं त्यांना पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
U19 World Cup Final: "मला धोनी सर आणि CSK ला..."; फायनलपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य