नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. डेव्हिड मिलरच्या शतकी खेळीनंतर देखील दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या आयोजनावर खदखद व्यक्त केली आहे. डेव्हिड मिलरनं देखील स्पर्धेच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली.
डेव्हिड मिलरनं स्पर्धेच्या वेळापत्रकावर टीका केली. भारतानं स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने दुबईत खेळले. तर, इतर संघांना यामुळं वारंवार प्रवास करावा लागला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 मार्चच्या सामन्यापूर्वी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ दुबईत दाखल झाले. भारतानं न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर सेमी फायनल कोणत्या संघात होणार हे ठरलं. भारताचा उपांत्य फेरीत सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार हे निश्चित झालं आणि दक्षिण आफ्रिकेला दुबईतून पाकिस्तानला परत जावं लागलं. जिथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीची लढत लाहोरमध्ये होणार होती.
मिलरनं म्हटलं की इंग्लं विरुद्धची शेवटची ग्रुप स्टेजमधील मॅच खेळल्यानंतर ते कराचीतून दुसऱ्या दिवशी दुबईत पोहोचले.दक्षिण आफ्रिकेचा संघ सायंकाळी 4 वाजता दुबईत पोहोचला. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सातवा वाजता पुन्हा लाहोरला जाण्यासाठी विमानं निघाला.
डेव्हिड मिलर म्हणाला प्रवास जरी 1 तास 40 मिनिटांटा असला तरी आम्ही मॅच खेळल्यानंतर पहाटे दुबईसाठी निघालो. आम्ही दुबईत 4 वाजता पोहोचलो. तिथून पुन्हा साडे सात वाजता लाहोर साठी निघालो. हा दीर्घकालीन प्रवास नव्हता. त्यामुळं आम्हाला पुन्हा सज्ज होण्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक होता. मात्र, ही आदर्श स्थिती नव्हती, असं डेव्हिड मिलरनं म्हटलं.
डेव्हिड मिलरचा फायनलमध्ये पाठिंबा कुणाला?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीची लढत भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे आहे. डेव्हिड मिलरनं म्हटलं की , प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा पाठिंबा न्यूझीलंडला असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम फेरीचा सामना दुबईत होणार आहे. हा सामना 9 मार्चला होईल.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय क्रिकेट संघ टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर आयसीसी स्पर्धेतील दुसरं विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर, टीम इंडिया मायदेशातील कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
इतर बातम्या :