IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची (Kochi) येथे काल (23 डिसेंबर) मिनी ऑक्शन (Mini Auction) पार पडलं. तब्बल सहा तास चाललेल्या या ऑक्शनमध्ये 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या ऑक्शनमध्ये सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांच्यावर सर्वात बोली लागली. दरम्यान, मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. या किंमतीसह तो आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे.
मिनी ऑक्शननंतर सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथ यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना बेन स्टोक्सला खरेदी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला विकत घेतल्यावर एमएस धोनीची प्रतिक्रिया काय होती हे देखील सांगितलं. विश्वनाथ म्हणाले, 'आम्ही स्टोक्ससाठी खूप उत्सुक आहोत. आम्हाला अष्टपैलू खेळाडूची गरज होती आणि स्टोक्स आमच्या संघात आल्यानं महेंद्रसिंह धोनीनं आनंद व्यक्त केला.
चेन्नईच्या संघानं विकत घेतलेले खेळाडू
बेन स्टोक्स (16.25 कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), कायल जेमिसन (एक कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).
चेन्नईचा संपूर्ण संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्ष्णा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, मथिशा पाथिराना, सुभ्रांशु सेनापती, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, भगत वर्मा, अजय जाधव मंडल, काईल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद आणि अजिंक्य रहाणे.
बेन स्टोक्सची चेन्नईच्या संघात एन्ट्री
चेन्नईकडे ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या रूपात दोन चांगले सलामीवीर आहेत. तसेच मोईन अली, रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्स या तीन अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या हंगामात चांगली गोलंदाजी करणारा मुकेश चौधरी गोलंदाजीचं नेतृत्व करेल आणि दीपक चाहर त्याला साथ देण्यासाठी उपस्थित असेल.
चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, समरजीत सिंह, महिश तिक्ष्णा, मुकेश चौधरी.
हे देखील वाचा-