Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादव याच्या घरी महिला दिनी कन्येचा जन्म झालाय. स्वतः उमेश यादव याने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच उमेश यादव यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.  त्या दुखानंतर आता उमेश यादव यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. 


टीम इंडिया 9 मार्च रोजी अहमदाबाद येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना खेळणार आहे. या निर्णायक सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहचली असून सराव सुरु केला.  टीम इंडियातील उमेश यादव याच्या घरी कन्येचे आगमन झालेय.  उमेश यादव दुसऱ्यांदा बाप झालाय. उमेश यादव याने ट्वीट करत स्वत: याची माहिती दिली आहे. 


इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादव याने भेदक मारा केला होता. उमेश यादवने मोक्याच्या क्षणी आणि महत्वाच्या तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. मोहम्मद शामीच्या अनुपस्थितीत उमेश यादव याने भेदक मारा केला होता. 
 










दोन आठवड्यापूर्वी उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं निधन झालं होतं. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वडिलांच्या जाण्याने उमेशवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण आता घरात मुलीचं आगमन झाल्यामुळे हा दुःखाचा डोंगर हलका झाला असेल.  विशेष म्हणजे महिला दिनालाच उमेश यादवला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उमेश यादव याने विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. वेग आणि अचूक टप्प्यामुळे उमेश यादव याने अल्पवधीतच आपलं नाव कमावलं. उमेश यादवने दमदार कामगिरीच्या जोरावर 2010 मध्ये भारीय संघात स्थान पटकावलं. उमेश यादव गेल्या काही दिवसांपासून कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे.  उमेश यादवने 54 कसोटी, 75 वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 165 विकेट, वनडेत 106 आणि टी20 मध्ये 12 विकेट घेतल्या आहेत.


आणखी वाचा :


मुंबईच्या टिम डेविडचा PSL मध्ये धमाका; सलग पाच षटकार,  20 चेंडूत झळकावलं अर्धशतक 


जोनासनची अष्टपैलू खेळी, दिल्लीचा युपी वॉरिअर्सवर 42 धावांनी विजय