PSL 2025 Video : आजकाल पाकिस्तान रडारवर आहे, मग ते राजकीय मुद्दे असोत किंवा क्रिकेट. आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. एका सामन्यादरम्यान कॉलिन मुनरो आणि मोहम्मद रिझवान मैदानात भिडले. या वादाचे कारण पाकिस्तानी अष्टपैलू इफ्तिखार अहमद होता. मंगळवारी रात्री मुलतान सुल्तान्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. इस्लामाबाद युनायटेडने मुलतान सुल्तान्सचा 7 विकेट्सने पराभव केला.  

इफ्तिखारवर चकिंगचा आरोप 

कॉलिन मुनरोने इफ्तिखार अहमदवर चकिंगचा आरोप केला, त्यानंतर वातावरण तापले. सामना काही काळ थांबवावा लागला. इस्लामाबाद युनायटेडच्या डावाच्या 10 व्या षटकात ही घटना घडली. इफ्तिखारने मुनरोच्या पायाच्या बोटांवर चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर न्यूझीलंडचा फलंदाज मुनरोने इफ्तिखारकडे वळून इशारा केला की, इफ्तिखारने गोलंदाजी करताना चुकीच्या पद्धतीने कोपर वाकवला होता. त्याने थेट त्याच्यावर चकिंगचा आरोप केला.

इफ्तिखारची नक्कल करताना कॉलिन मुनरो सांगितले. पाकिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूने हा आरोप गांभीर्याने घेतला नाही. तो थेट पंचांकडे गेला आणि स्पष्टीकरण मागितले. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी पंचांनी ताबडतोब हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कॉलिन मुनरोवर नाराज असलेल्या इफ्तिखार भोवती मुलतान सुल्तानच्या खेळाडूंनी गर्दी केली. पाकिस्तानचा कर्णधार आणि मुलतानचा कर्णधार मोहम्मद रिझवान मग तेथे आला. रिझवान आणि मोनरो यांच्यात जोरदार वादही झाला. या सामन्यात मुनरोने 45 धावांची शानदार खेळी खेळली.

या सामन्यात, मुलतान सुल्तान संघाने प्रथम फलंदाजी करत 168 धावा केल्या. संघाकडून उस्मान खानने 61 धावांची खेळी खेळली आणि मोहम्मद रिझवानने 36 धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही. यानंतर, इस्लामाबाद युनायटेडकडून अँड्रीस गॉसने 45 चेंडूत 80 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. कॉलिन मुनरोने 45 धावा केल्या. इस्लामाबादला विजय मिळवून देण्यात या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

हे ही वाचा - 

IPL 2025 Points Table : काव्या मारन अन् MS धोनी एकाच पटरीवर... आता एक पराभव अन् खेळ खल्लास! मुंबई इंडियन्सची 'या' 4 संघासोबत स्पर्धा, जाणून समीकरण

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर 'क्रिकेट स्ट्राईक', PSL सामन्यांचे टेलिकास्ट बंद, पाक क्रिकेट बोर्ड अडचणीत