Most Wickets in ODI Debut: स्कॉटलँडच्या चार्ली कैसेल (Charlie Cassell) ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेत इतिहास रचला. पदार्पणाच्या मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कगिसो रबाडा आणि फिडल एडवर्ड्सचा विक्रम  चार्ली कैसेलनं मोडला. स्कॉटलँडच्या युवा खेळाडूनं नऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. रबाडा आणि एडवर्ड्सनं पदार्पणाच्या सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. चार्लीच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर स्कॉटलँडनं ओमानला 8 विकेटनं पराभूत केलं. आयसीसीनं चार्ली कैसेलच्या कामगिरीची दखल घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या कामगिरीची दखल घेत पोस्ट केली आहे.


5.4 ओव्हरमध्ये 7 विकेट  


आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मध्ये स्कॉटलँड आणि ओमान यांच्यात मॅच पार पडली. ओमानची टीम पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली होती. ओमानच्या संघाला केवळ 91 धावा करता आल्या. कारण चार्ली कैसेलनं  केलेली ऐतिहासिक कामगिरी होय. ओमानच्या मधल्या फळीतील फलंदाज झिशान मकसूदची पहिली विकेट घेतली. त्याच ओव्हरमध्ये अयान खान आणि खलीद कैलची पण विकेट घेतली. एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेणाऱ्या चार्ली कैसेलला हॅटट्रिक करता आली नाही.    


चार्ली कैसेलनं पहिल्या 9 बॉलमध्ये एकही रन देता आणि चार विकेट घेतल्या होत्या. त्यानं 5.4 ओव्हर गोलंदाजी केली. चार्ली कैसेलनं 21 धावा देत 7  विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेट साम्यात पदार्पण करणाऱ्या चार्ली कैसेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला.फिडल एडवर्ड्सनं सहा विकेट 2003 मध्ये तर कगिसो रबाडानं 2015 मध्ये पदार्पणाच्या मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या.  


चार्ली कैसेलला कशी संधी मिळाली?


चार्ली कैसेलचं रेकॉर्ड महत्त्वाचं आहे कारण ही लीग सुरु झाली तेव्हा त्याला स्कॉटलँडच्या संघात सहभागी करुन घेण्यात आलं नव्हतं. स्कॉटलँडचा वेगवान गोलंदाज क्रिस सोल वैयक्तिक कारणांमुळं मालिकेतून बाहेर पडला. क्रिस सोलच्य जागी चार्ली कैसेलला संधी देण्यात आली होती. स्कॉटलँडचा कॅप्टन रिची बेरिंग्टन यानं चार्ली कैसेलला संघाची कॅप दिली.


पाहा व्हिडीओ : 






संबंधित बातम्या :



 

क्रिकेटमध्ये अजब नियम लागू, षटकार मारल्यास फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, नवा नियम चर्चेत