Fastest test century records : कसोटी क्रिकेटमध्ये (Test record) फलंदाजी ही अधिकवेळा संथगतीने होताना दिसते.  पण काही स्फोटक फलंदाज टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटीतही फलंदाजी करतात. कपिल देवपासून ते ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि वीरेंद्र सेहवागपर्यंत असे अनेक फलंदाज आहेत, जे नेहमीच कसोटी क्रिकेटमध्येही वेगवान फलंदाजी करताना दिसून आले आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने एकदा फक्त 54 चेंडूत कसोटी शतक झळकावलं होतं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज तो ठरला आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप-10 क्रिकेटर्स कोण आहेत ते पाहूया...


1. ब्रेंडन मॅक्क्युलम: फेब्रुवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमने केवळ 54 चेंडूत शतक झळकावलं. या कसोटीत त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागलं असले तरी त्याने केलेला रेकॉर्ड आजही अबाधित आहे.


2. सर विव्ह रिचर्ड्स: वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फलंदाजाने एप्रिल 1986 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केवळ 56 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 240 धावांनी पराभव केला होता.


3. मिसबाह-उल-हक: पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकनेही कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 56 चेंडूत शतक झळकावण्याचा करिष्मा केला आहे. त्याने ऑक्टोबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे विक्रमी शतक झळकावले होते.


4. अॅडम गिलख्रिस्ट: ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने 57 चेंडूत कसोटी शतक झळकावलं आहे. डिसेंबर 2006 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध हे शतक झळकावले होते.


5. जॅक ग्रेगरी: ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रेगरी यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम प्रदीर्घ काळ होता. त्यांनी 100 वर्षांपूर्वी 1921 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 67 चेंडूत शतक झळकावले होते. 65 वर्षांपासून कसोटीतील सर्वात जलद शतकाचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांचा विक्रम मोडण्यात व्हिव्ह रिचर्ड्स यांना यश आलं.


6. शिवनारायण चंद्रपॉल: वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने एप्रिल 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 69 चेंडूत शतक झळकावले होते.


7. डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही 69 चेंडूत शतक झळकावले आहे. जानेवारी 2012 मध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पर्थ कसोटीत त्याने हा विक्रम केला होता.


8. ख्रिस गेल: युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा, विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 70 चेंडूत शतक झळकावलं. डिसेंबर 2009 मध्ये झालेला हा सामना खूपच रोमांचक होता. यात ऑस्ट्रेलियाला केवळ 35 धावांनी विजय मिळवता आला.


9. रॉय फ्रेडरिक्स: डिसेंबर 1975 मध्ये, वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 चेंडूत कसोटी शतक झळकावले.


10. कॉलिन डी ग्रँडहोम: डिसेंबर 2017 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात, किवी अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोमने 71 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावलं.


हे देखील वाचा-