India vs Australia 3rd Test, Border Gavaskar Trophy : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्य मैदानात बुधवारी 1 मार्चपासून सुरु होत आहे. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे हा सामना जिंकून भारत मालिकाही नावावर करु शकतो. तर ऑस्ट्रेलियाला मालिकेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्याआधी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघाचा एक सरावाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इतर खेळाडूंची कॅचिंग प्रॅक्टीस घेताना दिसत आहे. अगदी मजा-मस्ती करत सर्व संघ सराव करत असून बीसीसीआयनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही बीसीसीआयनं फन टाईम्स विथ कोहली असं लिहिलं आहे.


पाहा VIDEO-






वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता


तिसरा सामना होणाऱ्या इंदूरमधील खेळपट्टीचा विचार केल्यास ही फलंदाजीसाठी उत्तम असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कारण इंदूरमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 353 आहे. पण अशातच इंदूरची लाल मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. अशामध्ये भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह या सामन्यात उतरु शकतो. विशेष म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियानं प्रत्येकी तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते, मात्र आता त्यात बदल होऊ शकतो. इंदूरची खेळपट्टी लाल मातीची बनलेली असेल, पण जसजसा सामना पुढे जाईल तसतशी वेगवान गोलंदाजांनी तयार केलेल्या रफमुळे ती फिरकीपटूंसाठीही फायदेशीर ठरु शकते. असं झालंच तर मात्र कांगारुंना या मैदानावर 12.50 ची सरासरी असलेल्या रविचंद्रन अश्विनपासून जरा जपूनच राहावं लागेल.  


तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ 


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.


हे देखील वाचा-