Mohammed Shami Update For Border-Gavaskar Trophy 2024-25 पर्थ: मोहम्मद शमी दुखापतीमुळं गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर दुखापतीमुळं मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर होता. रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीनं बंगालकडून खेळताना मध्य प्रदेश विरूद्धच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे. शमीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं असलं तरी त्याच्यासाठी अजून भारतीय संघाची दारं उघडलेली नाहीत.  


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थमध्ये सुरु होणार आहे. ही कसोटी 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्यानं जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराहनं मालिका सुरु होण्यापूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहनं मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट दिली आहे. 


जसप्रीत बुमराहनं थेटपणे भाष्य न करता मोहम्मद शमी आस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत टीम इंडियाकडून खेळू शकतो, असे संकेत दिले. भारतीय क्रिकेट संघाचं संघ व्यवस्थापन मोहम्मद शमीवर लक्ष ठेवून असल्याचं बुमराह म्हणाला. पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहला मोहम्मद शमीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की शमी भाईनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे, तो टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे, संघ व्यवस्थापन त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. सर्व काही गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर तुम्ही मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियात पाहू शकता, असं बुमराहनं म्हटलं.


मोहम्मद शमीनं रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. मोहम्मद शमीनं 13 ते 16 नोव्हेंबरमध्ये झालेल्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामन्यातून कमबॅक केलं होतं. तब्बल एका वर्षानंतर कमबॅक केलेलं असूनही  मोहम्मद शमीनं 7 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमी बंगालकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळताना पाहायला मिळू शकतो. भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोहम्मद शमी  टीम इंडियाकडून कधी खेळणार याची प्रतीक्षा आहे. शमीनं कमबॅक केल्यास भारतीय टीमला फायदा होणार आहे.  


दरम्यान,टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असल्यास ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. न्यूझीलंड विरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारताला या मालिकेत विजय मिळवणं आवश्यक आहे.


इतर बातम्या :


विश्वचषक गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूवर जर्मनीत सर्जरी; नेमकं काय घडलं?


BGT 2024: रोहित शर्मा- शुभमनग गिलनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, वेगवान गोलंदाज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून बाहेर