Bhuvneshwar Kumar Record India vs South Africa, 2nd T20I : भारताचा स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा कमाल केली आहे. त्याने आतापर्यंत अनकेदा प्रभावी मारा करत प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडे मोडले. भुवनेश्वर कुमारच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यातही भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत विक्रमला गवसणी घातली आहे. पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेच्या रीजा हेड्रिंक्सला बाद करत खास विक्रम नावावर केलाय.  


भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 149 धावांचे लक्ष दिले होते. प्रत्युत्तर दाखल दक्षिण आफ्रिकेनं 18.2 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून टेम्बा बावुमा आणि रीजा हेंड्रिक्स मैदानात उतरले होते. पण पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने हेंड्रिक्सला बाद केले. या विकेटसह भुवनेश्वर कुमारने खास विक्रम केलाय. टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने 11 विकेट घेतल्या आहेत.  


टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेणाऱ्या गोलंदाजात भुवनेश्वर कुमार पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आशिष नेहराचा क्रमांक आहे. 


स्विंग मास्टरचा आणखी एक विक्रम - 
भुवनेश्वर कुमारने कटकमधील टी 20 सामन्यात पॉवरप्लेमध्ये तीन षटक टाकली. यामध्ये 10 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने रीजा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस आणि रासी वान दर डुसेन यांना तंबूचा रस्ता दाखवला.  या तीन विकेट घेत भुवनेश्वर कुमारने खास विक्रम नावावर केलाय. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार पहिल्या क्रमांकावर विराजमान झालाय. त्याने सॅम्युअल बद्री आणि टिम साऊदीचा विक्रम मोडलाय. 


T20I पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज 
33 – भुवनेश्वर कुमार
33 – सॅम्युअल बद्री
33 – टिम साउदी
27 – शाकिब अल हसन
26 – जोश हेजलवुड
26 मुस्तफिजुर रहमान
26 – मिशेल स्टार्क