नवी दिल्ली :बीसीसीआयनं (BCCI) दुलीप ट्रॉफीसाठी (Duleep Trophy) चार संघांची घोषणा केलेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली दुलीप ट्रॉफी खेळतील अशी आशा अनेकांना होती. मात्र, बीसीसीआयनं त्यांना विश्रांती दिली आहे. या दोघांसह आर. अश्विन अन् जसप्रीत बुमराह देखील दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत. या स्पर्धेला सुरुवात 5 सप्टेंबरपासून होणार असून 22 सप्टेंबर रोजी अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईस्वरन आणि श्रेयस अय्यर हे चार संघांचे कर्णधार असतील. विशेष बाब म्हणजे सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीत खेळणार असून तो ऋतुराज गायकवाडच्या संघात आहे.  


नितीश कुमार रेड्डी याची ब संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, फिटनेस टेस्टमध्ये तो यशस्वी झाल्यास त्याला संघात स्थान मिळेल, अन्यथा स्पर्धेला मुकावं लागणार आहे. भारताच्या टी 20 संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वात खेळावं लागणार आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यर देखील ड संघाचा कॅप्टन असून त्याच्यासोबत आयपीएल खेळणाऱ्या हर्षित राणा , केएस भरत हे देखील त्याच्याच संघात आहेत.


दुलीप ट्रॉफीचे चार संघ


टीम अ : शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशागरा, शास्वत रावत,


टीम बी : अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज,यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन. जगदीसन  


टीम सी : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव, बी. इंद्रजिथ, रितीक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, व्यषक विजयकुमार, अन्सुल कंबोज, हिमांशु चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर),संदीप वॉरिअर


रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती


टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, प्रमुख खेळाडू विराट कोहली दुलीप ट्रॉफीत खेळणार अशा चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयनं या दोन्ही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर, दुसरीकडे आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे. आगामी काळात भारताचे बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने आहेत. त्यामुळं वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती संघात महत्त्वाची असणार आहे. 


संबंधित बातम्या :



KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून IPL 2024 संदर्भात प्रश्न, 80 हजारांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय?