IND vs BAN, World Cup 2023 : पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शन्तो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या माऱ्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. आजच्या सामन्यात टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
शाकीब संघाबाहेर -
दुखापतीमुळे बांगलादेशचा नियमित कर्णधार शाकीब अल हसन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. शांतो नाणेफेकीसाठी मैदानात आला होता. शाकीबच्या अनुपस्थिती बांगलादेशला मोठा फटका बसणार आहे. 2007 पासून शाकीब बांगलादेशसाठी खेळत आहे. महत्वाच्या सामन्यात शाकीबची अनुपस्थिती बांगलादेशला खलणार आहे.
बांगलादेशविरोधात भारताचे 11 शिलेदार -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
बांगलादेशचे शिलेदार कोणते ?
लिट्टन दास, तंजीद हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम
आज भारताला नंबर एक होण्याची संधी -
पुण्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करत भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज करण्याची संधी आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या तीन सामन्यात तीन विजयासह दुसरे स्थान पटकावले आहे. आज बांगलादेशी टायगरचा परभाव करत पुन्हा अव्वल स्थान काबिज करण्याची टीम इंडियाकडे संधी असेल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा पुण्याच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.