Continues below advertisement

Bangladesh Players Vehicles Attacked After ODI Series : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने (Afghanistan vs Bangladesh) तब्बल 200 धावांनी विजय मिळवून इतिहास रचला. यासोबतच अफगाण संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने एकतर्फी विजय मिळवत मालिका खिशात घातली. मंगळवारी अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 293 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर बांगलादेशचा संपूर्ण संघ केवळ 93 धावांवर गारद झाला.

बांगलादेशच्या चाहत्यांचा संताप अनावर

Continues below advertisement

आपला फक्त दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या बिलाल सामीसमोर बांगलादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले. त्याने केवळ 7.1 षटकांत 33 धावांत 5 विकेट्स घेतल्या आणि आपल्या करिअरमधील पहिल्याच पंजा उघडला. मेहदी हसन मिराजच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाला या मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे चाहत्यांचा संताप अनावर झाला. एका अहवालानुसार, खेळाडू जेव्हा बांगलादेशात परतले, तेव्हा एअरपोर्टवर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. इतकंच नाही, तर काही चाहत्यांनी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला केल्याचंही समोर आलं.

मोहम्मद नईम शेखचा भावनिक संदेश

या घटनेनंतर बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद नईम शेख (Mohammad Naim Sheikh Bangladesh Team Cricket Player) नाराज दिसला आणि त्याने सोशल मीडियावर आपली भावनिक व्यक्त केली. तो म्हणाला, "जिंकणं, हरणे हा खेळाचा भाग आहे. पण आमच्या गाड्यांवर हल्ला करणं योग्य नाही. आम्ही मैदानावर फक्त खेळण्यासाठी नाही उतरत, तर आमच्या देशाचं नाव घेऊन उतरतो. कधी आम्ही यशस्वी होतो, कधी नाही, पण प्रयत्न नेहमी देशासाठीच करतो. आम्हाला प्रेम हवं, द्वेष नाही. टीका चालेल, पण हिंसा नाही. हा झेंडा आमचा अभिमान आहे, आणि आम्ही देशासाठी पुन्हा उभे राहू.”

बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजय हा अफगाणिस्तानच्या वनडे क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. संपूर्ण मालिकेत अफगाणिस्तानने बांगलादेशवर वर्चस्व राखलं आणि टी20 मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेतला. तिसऱ्या सामन्यातील शानदार कामगिरीबद्दल बिलाल सामीला सामनावीर (Man of the Match) म्हणून गौरवण्यात आलं.

बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान – वनडे मालिकेचे निकाल

8 ऑक्टोबर 2025 : अफगाणिस्तानने पहिला वनडे 5 विकेट्सनी जिंकला11 ऑक्टोबर 2025 : अफगाणिस्तानने दुसरा वनडे 81 धावांनी जिंकला14 ऑक्टोबर 2025 : अफगाणिस्तानने तिसरा वनडे 200 धावांनी जिंकला

हे ही वाचा - 

Women's World Cup 2025 Points Table : वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ, ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक, टीम इंडिया अन् पाकिस्तान कुठे? जाणून घ्या सर्वकाही