ICC Womens World Cup 2025 Points Table : महिला विश्वचषक 2025 आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये (Australia qualified for Semi Final) पहिल्या स्थानावर आहे. गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा (Australia beat Bangladesh) पराभव करत सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. दुसरीकडे, पाकिस्तान संघाची उपांत्य फेरीची स्वप्ने जवळपास संपुष्टात आली आहेत. या विश्वचषकात पाकिस्तानला अद्याप एकही विजय मिळालेला नाही, तर भारत संघ टॉप-4 मध्ये आपले स्थान टिकवून आहे.
ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक (Australia qualified for Semi Final)
आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने 4 मध्ये विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. 9 गुणांसह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.
टीम इंडिया अन् पाकिस्तान कुठे?
पॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंड 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले असून 2 विजय आणि 2 पराभवांसह 4 गुण मिळवले आहेत आणि चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. 4 पैकी 3 सामने हरल्यानंतर आणि एक सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानकडे केवळ 1 गुण आहे व ती पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडची मजबूत दावेदारी
आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या सेमीफायनलमध्ये फक्त पॉइंट टेबलमध्ये टॉप चारमध्ये स्थान मिळवणाऱ्या चार संघांनाच क्वालिफाय करता येईल. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे पुढील तीन सामने जिंकावे लागतील. सध्या, टॉप चारमध्ये ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत आहेत. न्यूझीलंडकडे सध्या 4 सामन्यांतून 3 गुण आहेत. मात्र, उरलेले सर्व सामने जिंकल्यास त्या संघालाही उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. दुसरीकडे, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांच्या उपांत्य फेरीच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
हे ही वाचा -