Babar Azam Pakistan vs Bangladesh Test : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमचा वाईट काळ संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. पाकिस्तानचा 'किंग' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबर आझमचा फ्लॉप शो जवळपास दोन वर्षांपासून सुरू आहे. मायदेशात बांगलादेशविरुद्ध खेळतानाही बाबरला धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र जोरदार टीका होत आहे.


बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाबरने 0(2), 22(50), 31(77) आणि 11(18) धावा केल्या. चार डावात त्याच्या बॅटमधून 16 च्या सरासरीने फक्त 64 धावा आल्या आहेत. यापूर्वी बाबरला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धही धावा करता आल्या नाहीत.


616 दिवसांत ठोकले नाही एकही अर्धशतक   


आश्चर्याची बाब म्हणजे बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून 616 दिवस झाले आहेत. त्याला जवळपास 20 महिन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबरची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खरोखरच आश्चर्यकारक आहे. शेवटच्या वेळी त्याच्या बॅटमधून 2022 मध्ये धावा झाल्या होत्या. तेव्हापासून बाबरची बॅट 16 डावांपर्यंत शांत आहे.






बाबर आझमने डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 161 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या केवळ 41 धावांची आहे. बाबर इतर फॉरमॅटमध्ये धावा करतो असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून बाबर प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे.






एकेकाळी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहलीही धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि परतताना चमकदार कामगिरी केली. बाबर आझमनेही विराटकडून शिकावे आणि क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी. कोहलीने नंतर खुलासा केला की, ब्रेक दरम्यान त्याने बॅटला हातही लावला नाही.






पाकिस्तान संघ अडचणीत


बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने 10 गडी राखून गमावला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 274 धावा केल्या आणि बांगलादेशने 262 धावा केल्या आणि त्यांना फक्त 12 धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 100 धावापूर्वी 6 विकेट गमावल्या आणि मोठे लक्ष्य ठेवण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला. सामन्याला अजून एक दिवस शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत बांगलादेशला प्रथमच घरच्या मैदानावर पाकिस्तानला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. 


हे ही वाचा -


Natasa Stankovic : एकीकडे हार्दिक पांड्याच्या डेटिंगची अफवा; दुसरीकडे नताशा अचानक मुंबईत परतली; नेमकं कारण काय?


रोहित शर्मा OUT, विराट कोहली, एमएस धोनी IN; गौतम गंभीरने जाहीर केली भारताची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन!