Salman Ali Agha Support Babar Azam : बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. आज त्याची गणना पाकिस्तानच्या महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याची तुलना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. जरी आपण आकडेवारीबद्दल बोललो तर तो कोहलीच्या पुढे कुठेही नाही, परंतु असे असले तरी त्याचे नाव कोहलीशी निश्चितपणे जोडले जाते.


पण बाबर आझमची बॅट बऱ्याच दिवसांपासून पूर्णपणे शांत आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत चार डाव खेळूनही शतक तर सोडाच बाबरला अर्धशतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटसाठी ही निश्चितच गंभीर चिंतेची बाब आहे. दरम्यान चाहते पण बाबरला ट्रोल करत आहे.


मात्र संघाचा अष्टपैलू खेळाडू सलमान अली आगा याने त्याचा जोरदार बचाव केला आहे आणि ट्रोल करणाऱ्यांवर भडकला. 31 ऑगस्ट रोजी रावळपिंडी येथे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बाबर आझम केवळ 31 धावा करून बाद झाला. हा सलग दुसरा सामना होता ज्यात बाबर प्रभाव पाडू शकला नाही. याआधी बाबरची कामगिरी पहिल्या कसोटीतही निराशाजनक ठरली होती, जिथे तो पहिल्या डावात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आणि दुसऱ्या डावात त्याला केवळ 22 धावा करता आल्या.


सलमान अली आगा म्हणाला की, "बाबर आझम गेली पाच वर्षे सातत्याने धावा करत आहे. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा वाईट टप्प्यातून जात असता, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावे. संघात आणखी 10 खेळाडू आहेत, आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लवकरच बाबरला मोठ्या धावा काढले.


बाबर आझमच्या क्रमवारीवरही परिणाम


दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली होती, जिथे 179/4 या स्थितीत ते 274 धावांवर ऑलआऊट झाले होते. एकेकाळी पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मानला जाणारा बाबर आझम आता संघर्ष करताना दिसत आहे. विशेषत: रेड-बॉलमध्ये त्याचा फॉर्म घसरला आहे. त्याचे शेवटचे अर्धशतक डिसेंबर 2022 मध्ये आले होते. तेव्हापासून त्याची सरासरी धावसंख्या सतत घसरत आहे, ज्यामुळे त्याची कसोटी सरासरी 45 च्या खाली गेली आहे.


बाबर आझमच्या घसरत्या फॉर्मचा परिणाम आयसीसी क्रमवारीवरही झाला आहे. एक काळ असा होता की तो आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या तीनमध्ये होता, पण आता तो नवव्या क्रमांकावर घसरण गेला आहे. कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक केल्यानंतर त्याचे रेटिंग 882 होते, ते आता 734 वर घसरले आहे.


हे ही वाचा -


Yogesh Kathuniya : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! थाळी फेकमध्ये योगेशने जिंकले रौप्यपदक