ICC Player Of the Month : भारताचा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी (ICC Player of the motnh) नॉमिनेट झाला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याने केलेल्या दमदार खेळीमुळे त्याला नामांकन दिले आहे. अक्षर पटेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने 8 विकेट घेतल्या होत्या. अक्षरसह पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन यांनाही ICC ने प्लेअर ऑफ द मंथसाठी (ICC POTM) नामांकन मिळाल्यामुळे अक्षरसमोर ग्रीन आणि रिझवान यांचं आव्हान असेल.
अक्षरने सप्टेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने 4 षटकात केवळ 17 धावा देत 3 बळी घेतले होते. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात त्याने 2 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. अशाप्रकारे, त्याने संपूर्ण मालिकेत 10 ओव्हर टाकल्या आणि 63 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणूनही गौरविण्यात आलं.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि बांग्लादेशच्या निगर सुलताना यांना नामांकित करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा-