Michael Clarke: ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता माजी कर्णधार मायकल क्लार्कला त्याच्या गर्लफ्रेंडनं मारहाण केली आहे. दिग्गज क्रिकेट मायकल क्लार्कवर गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज हिनं प्रेमात धोका दिल्याचा आरोप केला आहे. मायकल क्लार्क आणि जेड यारब्रॉज यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत क्लार्क अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक भांडण झालं. एकमेंकांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. डेली टेलीग्राफने याचं सविस्तर वृत्त दिले आहे. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एकूण तीन जण आहेत. जेड यारब्रॉड हिने मायकल क्लाकवर प्रेमात धोका दिल्याचा आरोप करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मायकल क्लाकर्क आपल्यावरील आरोपचं खंडन करत आहे. त्यानं स्वत:च्या मुलीची शपथ घेतल्याचेही व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. क्लार्कनं गर्लफ्रेंडच्या बहिणीला चापट लगावल्याचेही दिसत आहे. मायकल क्लार्क आणि जेड यारब्रॉज यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं दिसत आहे. जेड यारब्रॉजने क्लार्कला मारल्याचं वृत्त आहे. या व्हिडीओमध्ये मायकल क्लार्क अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे... 


पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ......











रिपोर्ट्सनुसार, मायकल क्लार्क त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज आणि तिची बहिण जॅस्मिन यांच्यासह सुट्टीवर गेला होता. त्यावेळी जॅस्मिनचा नवराही सोबत आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास क्लार्क आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये भांडण झालं. क्लार्कच्या गर्लफ्रेंडची बहिण जॅस्मिन ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टिव्ही अँकर आहे.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी क्लार्कला ट्रोल केलेय. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी मायकल क्लार्क हा एक आहे. क्लार्कचं वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. मायकल क्लार्कनं मॉडल लारा बिंगल हिच्यासोबतच्या नात्यांमुळे चर्चेत आला होता. 2007 नंतर त्यांच्या डेटिंगचं वृत्त चर्चेत आलं होतं. दोघांच्या नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2012 मध्ये मायकल क्लार्कने कायली बोल्डी हिच्यासोबत लग्न केले. त्यांना 2015 मध्ये मुलगी झाली. 2020 मध्ये मायकल क्लार्कनं घटस्फोट घेतला होता. 


आणखी वाचा:
IND vs NZ Latest Bews Update : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट


IND vs NZ Latest Bews Update : शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!