Australian Open 2022: स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररनं (Roger Federer) अखेर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून  (Australian Open 2022) माघार घेतली. गुडघ्याच्या दुखापतीमुळं आपल्याला या स्पर्धेत खेळता येणार नसल्याचं त्यांनं स्पष्टीकरण दिलंय. एवढेच नव्हे तर, पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डनपर्यंत त्याच्या परतण्याच्या अपेक्षा धुसूर झाल्या आहेत. फेडरर त्याच्या कारकिर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळणार नाही.


दरम्यान सेरेना विल्यम्स, फेडरर यांच्यासारखे अव्वल टेनिसपटू ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळणार असल्याचं संयोजकांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. परंतु, आपल्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळं आपण अद्यापही तंदुरुस्त नसल्याचं कारण देत फेडररनं या स्पर्धेतून माघार घेतली. जर मी विम्बल्डनमध्ये खेळलो तर, अनेकांना आश्चर्य वाटेल, असंही फेडररनं म्हंटलंय. त्याच्या गुडघ्यावर काही आठवड्यांपूर्वी शस्त्रक्रिया झालीय. ही त्याच्या गुडघ्यावरील 18 महिन्यांतील तिसरी शस्त्रक्रिया होती. 


40 वर्षीय रॉजर फेडरर दिर्घकाळापासून गुडघ्यांच्या समस्येशी झुंज देतोय. त्याच्या गुडघ्यांवर गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मे महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याला 2020 मध्ये एकही स्पर्धा खेळता आली नव्हती. त्यानंतर फेडररनं कोर्टवर पुनारागमन केलं. दरम्यान, फ्रेंच ओपनमध्ये चौथी फेरी गाठल्यानंतर त्यानं स्पर्धेतून माघार घेतली. तर, बिम्बल्डनमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तेव्हापासून त्यानं एकाही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. 


ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेऊन रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना मोठा झटका दिलाय. फेडरर आपल्या 21व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहतोय. मात्र, त्याची आणि त्याच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा आता आणखी लांबणीवर पडलीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-