Australia Vs South Africa: अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia Vs South Africa) यांच्यात टी 20 विश्वचषक 2021 सामना खेळण्यात आला. दरम्यान, या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रिलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात केवळ 118 धावा करता आल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. (Australia won by 5 wkts against South Africa)


दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सुरुवात डगमगताना दिसला. सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या टेम्बा बवुमा (12) आणि क्विंटन डिकॉक (7) यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. टेम्बा पाठोपाठ रस्सी दुस्सेनही (2) तंबूत परतला आहे. त्यानंतर हेन्रिच क्लासेनच्या (13) रुपात दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला. दरम्यान, मैदानात आलेल्या डेविड मिलर आणि मारक्रम जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर मिलर पायचीत झाला. त्यानंतर  ड्वेन प्रेटोरियर (1),  केशव महाराज (0) यांच्यापाठोपाठ अ‍ॅडन मारक्रम (40) माधारी परतले. दरम्यान, रबाडाने नाबाद 19 धावा केल्या आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 118 धावापर्यंत मजल मारता आली. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वार्नर आणि अॅरोन फिंच सलामी देण्यासाठी आले होते. मात्र, नोर्टीजेच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलिया अॅरोन फिंच शून्यावर बाद झाला. त्यानंतर डेव्हीड वार्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा विकेट्स गेला. वॉर्नर 15 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. यापाठोपाठ मिशेल मार्शचाही विकेट्स गेला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ 35 धावा करीत केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर, ग्लेन मॅक्सवेल 18 धावांवर असताना शम्सीने त्याचा त्रिफळा उडवला. मात्र, शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. 


दक्षिण आफ्रिकेकडून अॅन्रीच नॉर्टिजेने 2 विकेट्स घेतल्या. तर, कासिगो रबाडा, केशव महाराज, ताब्रेज शाम्सी यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळवता आला आहे.