IND vs AUS, World Cup 2023: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल कांगारुविरोधात मैदानात उतरणार नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात ट्रेविस हेड आणि सीन एबॉट प्लेईंग 11 चा भाग नाहीत.
भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, एडम जम्पा.
वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत 70 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्याचा निकाल लागला नाही. भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि कांगारु यांच्यामध्ये आतापर्यंत 54 सामने झाले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाला फक्त 14 सामन्यात विजय मिळला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 38 सामन्यात बाजी मारली आहे. दोन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. मायभूमीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
न्यूट्रल ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 25 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही.
आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 12 वेळा आमना सामना झाला आहे. त्यामध्ये भारताला फक्त चार सामन्यात विजय मिळाला, तर 8 सामन्यात कांगारुंनी बाजी मारली.
चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. येथेही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. कांगारुंनी चेन्नईमध्ये दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एक सामना जिंकता आला आहे.