Australia tour of India : भारतीय संघानं (Team India) नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर न्यूझीलंडलाही एकदिवसीय आणि त्यानंतर टी20 मालिकेत भारतानं विजय मिळवला. पण आता भारताची खरी परीक्षा असणार आहे. कारण आता भारतासमोर कसोटी सामन्यांचं आव्हान असणार असून समोर दमदार असा ऑस्ट्रेलियाचा संघ असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असल्याने एक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका उद्यापासून  (9 फेब्रुवारी) सुरु होत असून या मालिकेत 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना नागपूर येथे खेळवला जाणार आहे. नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांची माहिती पुढीलप्रमाणे...

 कधी, कुठे पाहू शकता सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामने
 
कसोटी सामन्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. लवकरच एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष्य देत असल्याने ही मालिकाही पाहण्याजोगी असणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) - 
 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 9-13 फेब्रुवारी 2023  नागपूर
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-