AUS vs PAK, World Cup 2023 :  ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 358 धावांच्या विराट आव्हानाचे पाकिस्तान संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या दोन्ही सलामी फलंदाजांनी कागांरुंची गोलंदाजी फोडली आहे. इमाम उल हक आणि अब्दुल्लाह शफीक यांनी शतकी भागिदारी करत पाकिस्तान संघाचे सामन्यात विजयाचे चान्सेस वाढले आहेत. पाकिस्तानच्या दोन्ही सलामी फलंदाजांनी अर्धशतके ठोकली आहेत. पाकिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात श्रीलंकेविरोधात 345 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता आजच्या सामन्यातही पाकिस्तानचा संघ चमत्कार करणार का ? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 


पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांनी अर्धशतके ठोकली आहेत. अब्दुल्लाह शफीक याने 61 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी केली.  यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. अब्दुल्लाह शफीक याने संयमी सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. पाकिस्तानचा अनुभवी सलामी फलंदाज इमाम उल हक याने यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले. इमाम 65 चेंडूमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 63 धावांवर खेळत आहे. अब्दुल्लाह शफीक आक्रमक खेळत असताना इमाम याने दुसऱ्या बाजूला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. अब्दुलाह शफीक आणि इमाम उल हक यांनी 134 धावांची भागीदारी केली. सध्या बाबर आझम आणि इमाम उल हक मैदानावर आहेत. 


ऑस्ट्रेलियाने खराब फिल्डिंगही केली. अब्दुलाह शफीक याचा सीमारेषावर झेल सोडला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन झेल सोडले आहेत. पाकिस्तान संघानेही फिल्डिंग करताना खराब फिल्डिंग केली होती. त्याचा फटका त्यांना बसला होता. डेविड वॉर्नर 11 धावांवर असताना त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर डेविड वॉर्नर याने दीडशतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानचे फलंदाज काय कारनामा करतात, हे येणारा काळच सांगेल. 


ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. स्टॉयनिसने सेट झालेल्या अब्दुल्लाह शफीक याला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे गोलंदाज मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांना विकेट घेता आली नाही. अॅडम झम्पालाही पाच षटकात विकेट घेता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल महागडा ठरला. त्याने तीन षटकात 26 धावा खर्च केल्या. मिचेल स्टार्क आणि कमिन्सही महागडा ठरला. 


ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर


डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्सच्या मोबद्लयात 367 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बेंगळुरुमध्ये 19 षटकार मारले. शाहीन शाह आफ्रिदीने पाच विकेट घेत पाकिस्तानला सामन्यात परत आणले. 


डेविड वॉर्नरचे वादळ - 


मागील तीन सामन्यात मोठी खेळी करु न शकणाऱ्या वॉर्नरने आज पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. डेविड वॉर्नर याने पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली.  डेविड वॉर्नरने 124 चेंडूत 163 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 9 षटकार आणि 14 चौकार लगवाले आहेत. डेविड वॉर्नर याने एकापाठोपाठ एक चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंगनेही मदत केली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी  वॉर्नरचे दोन झेल सोडले. डेविड वॉर्नरपुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी लोटांगण घातले होते. मिचेल मार्श याने 9 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावांची खेळी केली. मिचेल मार्श याने डेविड वॉर्नर याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 33.5 षटकात 259 धावांची भागीदारी केली.