IND vs NEP highlights : भारताचा नेपाळवर 23 धावांनी विजय, जयस्वाल-बिश्नोई चमकले

Asian Games 2023 India vs Nepal Live Score : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 03 Oct 2023 09:54 AM
नेपाळचा 23 धावांनी पराभव

नेपाळचा 23 धावांनी पराभव

नेपाळला 6 चेंडूत 30 धावांची गरज

नेपाळला 6 चेंडूत 30 धावांची गरज आहे. भारताला दोन विकेटची गरज

नेपाळला आठवा धक्का

नेपाळला आठवा धक्का बसलाय.. भारत विजयापासून दोन पावले दूर

नेपाळला सातवा धक्का

नेपाळला सातवा धक्का.. भारताची विजयाकडे वाटचाल

150 धावांत सहा फलंदाज तंबूत

नेपाळचे 150 धावांत सहा फलंदाज तंबूत परतले आहेत

नेपाळचा अर्धा संघ तंबूत

127 धावांत नेपाळचा अर्धा संघ तंबूत परतलाय. 

नेपाळचे चार फलंदाज तंबूत

नेपाळचे चार फलंदाज तंबूत परतले आहेत. रवि बिश्नोईने दोन फंलदाजांना तंबूत पाठवले

नेपाळची अश्वासक सुरुवात, 10 षटकांत 73 धावा

नेपाळचे दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले आहेत. 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने अश्वासक सुरुवात केली आहे. नेपाळने दोन विकेटच्या मोबदल्यात 10 षटकांत 73 धावा चोपल्या आहेत.

भारताला पहिले यश

आवेश खान याने भारताला पहिले यश मिळवून दिले. नेपाळच्या सलामी फलंदाजाला तंबूत धाडले. नेपाळ एक बाद 40 धावा

नेपाळची फलंदाजी सुरुवात

नेपाळच्या फलंदाजीला सुरुवात झाली. अर्शदीपच्या पहिल्या षटकात आठ धावा निघाल्या

दुबे-रिंकूचा फिनिशिंग टच -






यशस्वीचा शतकी तडाखा -

 


भारताचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायस्वाल याने शतक ठोकले आहे. असा पराक्रम करणारा यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल याने 49 चेंडूत शतक ठोकले. या शतकी खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि आठ चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल याने ऋतुराजसोबत शतकी खेळी केली, त्यानंतर भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.  

भारताची 203 धावांपर्यंत मजल

यशस्वी जायस्वालचे वादळी शतक आणि रिंकू-दुबेच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. तर अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली. नेपाळला विजयासाठी 203 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

भारताच्या 200 धावा

भारताच्या 200 धावा

भारताला चौथा धक्का, यशस्वी जायस्वाल शतकानंतर बाद झाला

यशस्वी जायस्वाल शतकानंतर बाद झाला

यशस्वी जायस्वालची शतकी खेळी

यशस्वी जायस्वालची शतकी खेळी... 48 चेंडूत ठोकले शतक

भारताला तिसरा धक्का, जितेश शर्मा तंबूत

भारताला लागोपाठ तिसरा धक्का बसला आहे. जितेश शर्मा स्वस्तात बाद झाला आहे. भारत तीन बाद 119 धावा

भारताला दुसरा धक्का, तिलक वर्मा बाद

भारताला दुसरा धक्का बसला आहे. तिलक वर्मा स्वस्तात तंबूत परतला आहे. जितेश शर्मा फलंदाजीसाठी मैदानात आलाय. 

भारताला पहिला धक्का, ऋतुराज तंबूत

ऋतुराज गायकवाडच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. दीपेंद्रच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ऋतुराज गायकवाड 25 धावांवर बाद झाला. भारत एक बाद 103 धावा

टीम इंडियाचे शतक

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने वादळी सुरुवात केली आहे. अवघ्या 9 षटकार ऋतुराज आणि यशस्वी जायस्वाल यांनी टीम इंडियाचे शतक फलकावर लावले आहे. यशस्वी जायस्वाल 72 तर ऋतुराज 25 धावांवर खेळत आहे.

यशस्वी जायस्वालचे दमदार अर्दशतक

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी केली. यशस्वी जायस्वाल याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक ठोकले. यशस्वी जायस्वाल याने षटकारांचा पाऊस पाडला. षटकार मारत यशस्वीने अर्धशतक ठोकले.

भारताची दमदार सुरुवात

ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जायस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. भारत बिनबाद 71 धावा

भारताचे अर्धशतक

अवघ्या 4 षटकार भारताच्या फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जायस्वाल यांनी नेपाळच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल 38 धावांवर नाबाद आहे.

भारताची वादळी सुरुवात

ऋतुराज आणि यशस्वी जायस्वाल यांनी भारताची वादळी सुरुवात केली. 2 षटकानंतर बिनबाद 22 धावा. 

भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले आहेत. 

नेपाळची प्लेईंग 11

रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), संदीप जोरा, गुलसन झा, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहारा, संदीप लामिछाने.

भारताची प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, आर साई किशोर, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह.

भारताची प्रथम फलंदाजी

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळविरोधात होत आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

भारताने टॉस जिंकला

टॉस भारताने जिंकाला

सामना कधी सुरु होणार ?

भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कधी सुरु होणार?








टीम इंडियचे शिलेदार...

भारत- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, अवेश खान , अर्शदीप सिंह.

एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ?

एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार 


आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. सोनी लाइव्ह अॅपवर अथवा संकेतस्थळावर मोफत सामना पाहता येईल.

कुठे होणार सामना

 


19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील. ZJUT क्रिकेट स्टेडियम थरार पाहायला मिळणार आहे. 

थोड्याच वेळात होणार टॉस

आशियाई क्रीडा गेम्स मध्ये आज भारत आणि नेपाल यांच्या मध्ये सामना होणार आहे. थोड्याच वेळात टॉस होईल

थोड्याच वेळात होणार टॉस

आशियाई क्रीडा गेम्स मध्ये आज भारत आणि नेपाल यांच्या मध्ये सामना होणार आहे. थोड्याच वेळात टॉस होईल

पार्श्वभूमी

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. आता मंगळवारपासून टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुवात करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्वच क्रीडा चाहत्यांना आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेय. आता ऋतुराज गायकवाडच्या संघाचा सुवर्णपदक पटकावण्याचा नंबर असेल. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत होईल.


नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या नऊ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. इतकेच काय तर टी20 मध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रमही नेपाळ संघाने केला आहे. पण आता नेपाळसमोर तगड्या टीम इंडियाचे मजबूत आव्हान असेल.


भारताशिवाय पाकिस्तान संघानेही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानचा सामना हाँगकाँग संघासोबत असेल. तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. अखेरचा आणि चौथा क्वार्टर फायनल सामना बांगलादेश आणि मलेशिया संघामध्ये होणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारतीय संघाने उप उपांत्य फेरीत नेपाळचा पराभव केल्यास उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेश आणि मंगोलिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. 


कुठे होणार सामना -  


19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील. ZJUT क्रिकेट स्टेडियम थरार पाहायला मिळणार आहे. 


भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कधी सुरु होणार?









एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ? 


आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. सोनी लाइव्ह अॅपवर अथवा संकेतस्थळावर मोफत सामना पाहता येईल.



आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळचे संघ - 


भारत- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, अवेश खान , अर्शदीप सिंह.


राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.


Ruturaj Gaikwad (c), Mukesh Kumar, Shivam Mavi, Shivam Dube, Prabhsimran Singh (wk), Yashasvi Jaiswal, Rahul Tripathi, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Avesh Khan, Arshdeep Singh.


नेपाळ- रोहित पौडेल (कर्णधार), करण केसी, प्रैटिस जीसी, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, गुलशन झा, सोमपाल कामी, सुदीप जोरा, बिनोद भंडारी, कुशल भुर्टेल, दीपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबंशी, बिबेक कुमार यादव, अभिनाश बोहरा, संदीप लामिछाने.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.