Team India (Senior Men) squad for 19th Asian Games : आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आलेय. 28 सप्टेबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान स्पर्धा रंगणार आहे. आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. विश्वचषकामुळे बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याचदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) म्हणजेच बीसीसीआयने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 15 जणांच्या चमूची निवड केली आहे. या संघाचे कर्णधारपद युवा ऋतुराज गायकवाड याच्येकडे देण्यात आलेय. आयपीएलमध्ये मागील काही वर्षांपासून दमदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, जितेश शर्मा, प्रभसिमरन यांच्याशिवाय अन्य युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदाची चर्चा होत असलेल्या शिखर धवन याला संघात देखील आपली जागा बनवण्यात अपयश आले.
भारतीय संघात कोण कोण ?
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर)
स्टँडबाय प्लेअर कोणते - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन
पुरुष संघाप्रमाणे महिला संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलेय. 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेता ठरला होता.
पाहा संपूर्ण संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सर्वाणी, तितास साधू, राजेश्वरी गायकवा, मिन्नू मानी, कनिका आहूजा , उमा छेत्री, अनुषा बरेड्डी
स्टँडबाय खिलाड़ी: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, साइका इशाक आणि पूजा वस्त्राकर