India A vs UAE A ACC Mens Emerging Teams Asia Cup 2023 : एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने विजायाने केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यूएईचा 8 विकेटने पराभव केला. कर्णधार यश धुल याने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. यश धुलच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने सहज विजय मिळवला. यूएईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 175 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्यु्त्तरदाखल भारताने हे आव्हान 26.3 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले. यश धुल याच्याशिवाय निकिन जोस याने नाबाद 41 धावांची खेळी केली.
यूएईने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर भारतीय संघ दबावात जाईल असे वाटले, पण कर्णधार यश धुल याने दमदार शतकी खेळी करत एकतर्फी विजय मिळवून दिला. साई सुदर्शन 8 तर अभिषेक शर्मा याने 19 धावांची खेळी केली.
यश धुल याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. यश धुल याने 84 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 108 धावांची खेळी केली. तर निकिन याने 53 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 41 धावांचे योगदान दिले. यश धुल याचे शतक आणि निकिन यांची छोचेखानी खेळीच्या बळावर भारताने आठ विकेट राखून सामना जिंकला. यूएईचा पराभव करत भारत अ संघाने एमर्जिंक आशिया चषकाची सुरुवात विजयाने केली.
प्रथम फलंदाजी करताना यूएईच्या संघाने निर्धारित 50 षटाकत 9 विकेटच्या मोबद्लयात 175 धावांपर्यंत मजल मारली. सलामी फलंदाज आर्यांश शर्मा याने 42 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार वलथापा चिंदबरम याने 107 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. कर्णधार वलथापा चिंदबरम याला एकही चौकार मारता आला नाही. मोहम्मद फराजुद्दीन याने 88 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय एकाही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. हर्षित राणा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हर्षित याने 9 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय नितीश रेड्डी याने 5 षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मानव सुथार याने 10 षटकात 28 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. आकाश सिंह याने एक विकेट घेतली.