नवी दिल्ली : आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 28 सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील सामने यूएईच्या दुबई आणि अबुधाबी येथील स्टेडियममध्ये होणार होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघाचे दोन गट करण्यात आले आहेत. आठ पैकी 6 संघांनी आशिया कप स्पर्धेसाठी टीमची घोषणा केलेली आहे. तर, दोन संघांनी अद्याप टीमची घोषणा केलेली नाही. भारत-पाकिस्तानसह सहा संघांनी आशिया कपसाठी टीम जाहीर केली आहे. आशिया कपसाठी निवडलेल्या संघात अजून एक बदलाची संधी सर्व संघांकडे आहे. भारतानं 19 ऑगस्टला संघ जाहीर केलेला आहे. त्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यानं जोरदार चर्चा झाली होती. भारतासह इतर देशांकडे संघात बदल करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
या तारखेपर्यंत परवागनीशिवाय संघात बदलाची संधी
आशिया कपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना 30 ऑगस्टपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय त्यांच्या टीममध्ये बदल करण्याची संधी आहे. एखादा खेळाडू जखमी झाला असण्याची देखील गरज नाही, इतर विशेष कारणांसाठी आपल्या टीममध्ये बदल करु शकतो. 30 ऑगस्टनंतर संघात बदल करण्यासाठी त्या देशाला आशियाई क्रिकेट काऊन्सिलची मदत घ्यावी लागेल.
कोणत्या देशांकडून टीम जाहीर
आशिया कप 2025 साठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमाननं आपला संघ जाहीर केला आहे. तर, श्रीलंका आणि यूएएईनं आपला संघ अजूनही जाहीर केलेला नाही. या दोन्ही देशांना 30 ऑगस्टपूर्वी त्यांचे संघ जाहीर करावे लागतील. हे दोन्ही देश कोणत्याही वेळी संघ जाहीर करु शकतात.
भारत पाकिस्तान मॅच 14 सप्टेंबरला
आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होणार आहे. दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये आमने सामने येतील. यंदाच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीनवेळा सामने होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग स्टेजनंतर सुपर 4 मध्ये सामना होऊ शकतो. दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचल्यास तिथं तिसऱ्यांदा लढत होऊ शकते.
आशिया कपसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना