Pakistan vs UAE Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये दुबईमध्ये पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात खेळला गेलेला सामना चर्चेत राहिला. पाकिस्तानने हा सामना 41 धावांनी जिंकला आणि सुपर फोरमध्ये स्थान मिळवले. पण, हा सामना नाट्यमय ठरला. हा सामना आधीच तासभर उशिरा सुरू झाला होता, कारण हस्तांदोलनाच्या वादावरून पीसीबी मॅच रेफरीवर संतापली होती आणि बॉयकॉट करण्याचा विचार करत होती. सामन्यादरम्यान, एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका पाकिस्तानी खेळाडूच्या चुकीमुळे पंच जखमी झाला. पण, माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमच्या टिप्पणीमुळे वाद पेटला.

पाकिस्तान आणि यूएई सामन्यात नेमकं काय घडलं?

ही घटना यूएईच्या डावात पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात घडली. पाकिस्तानचा विकेटकीपर हारिसने फेकलेला चेंडू थेट अंपायरच्या डोक्याच्या मागे लागला. चेंडू बसताच अंपायर खाली बसला. आणि लगेच पाकिस्तानी खेळाडू त्यांच्या जवळ धावून गेले आणि मेडिकल टीमला बोलावण्याचा इशारा केला. पाकिस्तानचा फिजिओ आला, त्याने कन्सशन टेस्ट केली. पण त्यानंतर अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांना सामना सोडून मैदानाबाहेर जावं लागलं.

वसीम अक्रम काय म्हणाला?

हे घडले तेव्हा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम समालोचन करत होते. तो म्हणाला, "बॉल थेट पंचाच्या डोक्यावर लागला. काय थ्रो. बुल्सआई." चाहत्यांना हे अजिबात आवडले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वसीम अक्रमच्या टिप्पणीवर चाहते नाराज होते आणि सोशल मीडियावर त्याला फटकारण्यात आले. काही वापरकर्त्यांनी त्याच्या टिप्पणीला "अनावश्यक" असेही म्हटले.

युएईला हरवून पाकिस्तान सुपर-4 मध्ये 

नाणेफेक जिंकून युएईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही, परंतु फखर झमान (50) चे अर्धशतक आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या 29 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे संघाला 146 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात युएईचा संघ 105 धावांतच गारद झाला. या विजयासह, टीम इंडियाने आधीच आपले स्थान निश्चित केल्यानंतर, पाकिस्तान ग्रुप ए मधून सुपर-4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला. भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामना 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हे ही वाचा -

India vs Pakistan Live Streaming, Asia Cup 2025 : भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; सामना कधी खेळवला जाणार?; A टू Z माहिती