नवी दिल्ली : आशिया कप  2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची पूर्व तयारी म्हणून आशिया कप स्पर्धा टी 20 प्रकारात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला आमने सामने येतील. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भारत  आणि पाकिस्तान गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. 

भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये अ गटात आहेत. भारत आणि पाकशिवाय ओमान आणि यूएई हे देखील अ गटात आहेत. यामुळं भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये पोहोचल्यास दोन्ही संघ पुन्हा आमने सामने येऊ शकतात. हा सामना 21 सप्टेंबरला होऊ शकतो. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास पुन्हा आमने सामने येऊ शकतात. आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. 

टी 20 वर्ल्ड कपमध्ये काय घडलेलं? पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणलेला

टी 20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने आले होते. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 119 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 12 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 72 धावा केल्या होत्या. म्हणजेच शेवटच्या 48 बॉलमध्ये पाकिस्तानला 48 धावा केल्या होत्या. मोहम्मद रिजवान आणि फखर जमान यासारखे स्टार फलंदाज मैदानावर होते. मात्र, भारतानं 6 धावांनी ती मॅच जिंकली होती. 

पाकिस्तानसाठी रिजवाननं  44 बॉलमध्ये 31 धावा केल्या. तर, बाबर आझमनं 10 बॉलमध्ये 13 धावा केल्या. उस्मान खान 15 बॉलमध्ये 13 ,फखर जमाननं 8 बॉलमध्ये 13 आणि शादाब खान यानं 7 बॉलमध्ये चार धावा केल्या. इमाद वसीम यानं 23 बॉलमध्ये 15 धावा केल्या. 

14  व्या ओव्हरनंतर पाकिस्तानच्या संघाला एक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. यामुळं पाकिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 113 धावा करु शकला. 

भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 14  धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, सिराजनं 4 ओव्हरमध्ये 19  धावा दिल्या. तर,हार्दिक पांड्यानं 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.

आशिया कपसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2  23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना