Asia cup 2023, Tilak Varma : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्माला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात सतरा जणांच्या चमूची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तिलक वर्मा याला संधी देण्यात आली आहे. तिलक वर्मा याने आतापर्यंत एकही आतंरराष्ट्रीय वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे तिलकच्या निवडीनंतर चर्चेला उधाण आले आहे. तिलक वर्मा याने टी२० क्रिकेटमध्ये प्रभावी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. 


तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले होते. या मालिकेत तिलक वर्माने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर तिलक वर्माला आशिया चषक आणि विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.  तिलक वर्मा याची जमेची बाजू म्हणजे तो डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करतो. भारताच्या मधल्या फळीत सध्या डाव्या हाताचे फलंदाज नाहीत. त्यामुळे तिलक वर्मा याचा समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आणि राहुल यांचेही संघात पुनरागमन झालेय. त्यामुळे भारतीय मध्यक्रम अधिक मजबूत झालाय.  


तिलक वर्मा याच्याबद्दल....


तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केलेय. मुंबईचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप गेल्यानंतर तिलक वर्मा याने एकहाती डाव सांभाळत आपली प्रतिभा दाखवून दिली होती. तिलक वर्मा याने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले. तिलक वर्मा याला अद्याप एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. मधल्या फळीत तिलक वर्मा याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. वेस्ट इंडिजविरोधातही त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांची वाह वाह मिळवली होती. तिलक वर्मा याने आतापर्यंत आयपीएलमधील 25 डावात 740 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 84 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  सहा आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये तिलक वर्मा याने 173 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धसतकाचा समावेश आहे. 15 चौकार आणि सात षटकार ठोकले आहेत. टी20 मध्ये एक विकेटही त्याने घेतली आहे. 


आशिया चषकासाठी भारताचा संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)