IND Vs SL Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Asia Cup 2023, IND Vs SL Live Updates : पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज श्रीलंकाविरोधात रोहित शर्मा आणि टीम दोन हात करणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 12 Sep 2023 10:56 PM
भारताचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय

कुलदीप यादवचा विकेटचा चौकार...भारताचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय

श्रीलंकेला नववा धक्का

कुलदीप यादव याने रजिथाला बाद करत श्रीलंकेला दिला नववा धक्का

श्रीलंकेचा आठवा गडी बाद

श्रीलंकेला आठवा धक्का, तीक्ष्णा बाद

श्रीलंकेला सातवा धक्का

जडेजाचा श्रीलंकेला सातवा धक्का, धनंजय डिसिल्वा शुभमन गिलकडून झेलबाद

आधी भेदक मारा नंतर धुव्वादार फलंदाजी... वेल्लालागे फूल फॉर्ममध्ये

आधी भेदक मारा नंतर धुव्वादार फलंदाजी... वेल्लालागे 29 धावांवर नाबाद

श्रीलंकेचं शतक

भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. श्रीलंकेने सहा विकेटच्या मोबदल्यात 110 धावा केल्या आहेत. 

श्रीलंकेला सहावा धक्का

रविंद्र जाडेजाने श्रीलंकेला दिला सहावा धक्का

श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत

73 धावांत  श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतलाय. कुलदीप यादवने घेतल्या दोन विकेट

श्रीलंकेला तिसरा धक्का

श्रीलंकेला तिसरा धक्का

श्रीलंकेला दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहचा भेदक मारा... श्रीलंकेला दिला दुसरा धक्का.... कुशल मेंडिस 15 धावांवर बाद

भारताला पहिले यश

निसांकाला बाद करत बुमराहने श्रीलंकाला दिला पहिला धक्का..... 

213 धावांवर भारताचा डाव आटोपला

213 धावांवर भारताचा डाव आटोपला... अक्षर पटेल याने 26 धावांची खेळी केली.

टीम इंडियाचे द्विशतक

अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दोनशे धावांपर्यंत मजल मारली आहे.

दहा मिनिटांचा ब्रेक होणार

सामन्याचा मिड ब्रेक फक्त दहा मिनिटांचा असेल.

थोड्याच वेळात सामन्याला होणार सुुरवात

7.15 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

पावसाची विश्रांती

भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय आलाय. भारत 9 बाद 197 धावा

भारताला नववा धक्का

कुलदीप आला ...कुलदीप गेला... भारताला नववा धक्का... भारत 9 बाद 186 धावा

भारताला आठवा धक्का

जसप्रीत बुमराहच्या रुपाने भारताला  आठवा धक्का बसलाय

भारताला आठवा धक्का

जसप्रीत बुमराहच्या रुपाने भारताला  आठवा धक्का बसलाय

भारताची फलंदाजी ढेपाळली

असलंका याने शानदार चेंडूवर रविंद्र जाडेजाला केले बाद... भारताला सातवा धक्का

भारताला सहावा धक्का

हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. वेल्लालागे याने घेतल्या पाच विकेट... भारत सहा बाद 172 धावा...  हार्दिक पांड्या पाच धावांवर बाद झाला. वेल्लालागे याने 10 षटकांत 40 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. 

भारताचा अर्धा संघ तंबूत

ईशान किशन बाद झाला... भारताला पाचवा धक्का बसलाय. असलंका याने भारताला दिला पाचवा धक्का... किशन 33 धावांवर बाद झालाय. भारत पाच बाद 170 धावा

वेल्लालागेचा भेदक मारा

श्रीलंकेच्या वेल्लालागे याने भारताच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. रोहित शर्मा, गिल, विराट आणि राहुल यांना वेल्लालागे याने बाद केलेय.

भारताला चौथा धक्का

केएल राहुलच्या रुपाने भारताला चौथा धक्का.... राुहल 39 धावांवर बाद.. भारत 4 बाद 154... वेल्लालेगा याने घेतली चौथी विकेट

भारताचे शतक

केएल राहुल आणि इशान किशन यांनी डाव सावरला... भारताचे फलकावर शतक

भारताला तिसरा धक्का

गिल, विराटनंतर रोहित शर्माही बाद झालाय.. वेल्लालागे याने घेतल्या तीन विकेट

भारताला दुसरा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसलाय. विराट अवघ्या तीन धावांवर बाद झालाय.

रोहित शर्माचे अर्धशतक

रोहित शर्माने अर्धशतक ठोकले... 44 चेंडूत केल्या 50 धावा... दहा हजार दावांचा पल्लाही केला पार

शुभमन गिल बाद

शुभमन गिलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय

भारताची सावध सुरुवात

भारताची सावध सुरुवात... रोहित शर्मा आणि गिल यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना केलाय. भारतीय संघ बिनबाद 26 धावा

सामन्याला सुुरुवात

रोहित आणि गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. रजिथा पहिले षटक घेऊन आलाय. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय 

शार्दूल ठाकूरला आराम

श्रीलंकेचा विजयरथ रोखणार का भारत ?

भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्यांदाच आमनेसामने असतील. सुपर 4 लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर श्रीलंका संघाने बांगलादेशला मात दिली होती. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे. श्रीलंका संघाने लागोपाठ 13 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान रोहित आणि टीमसमोर असेल.

श्रीलंकाविरोधात टीम इंडियाचे 11 शिलेदार - 

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

टीम इंडियात तीन फिरकी गोलंदाज

टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले आहे. शार्दूल ठाकूर याला आजच्या सामन्यात आराम देण्यात आला आहे. भारतीय संघात इतर कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय.

भारताने नाणेफेक जिंकली

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलंबोतील हवमान स्वच्छ

कोलंबोमध्ये सूर्यदेवाने दर्शन दिलेय. हवामान स्वच्छ आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल.

कशी आहे खेळपट्टी ? 

तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानावर परिणाम झालेला असू शकतो. रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रेमदासा स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. मैदानाची आऊटफिल्डही वेगवान आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतली तर धावांचा पाऊस पडेल.

कुठे रंगणार सामना? 

कुठे रंगणार सामना? 
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील सामना  कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 


भारतात कधी पाहता येणार सामना?
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणारा सामना भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 



लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.


पाऊस पुन्हा ठरणार महत्वाचा ?


Accuweather च्या वृत्तानुसार, मंगळवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.  मंगळवारी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.  

श्रीलंकाविरोधात श्रेयस अय्यर आजही नाही

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. 

पार्श्वभूमी

India vs Sri Lanka : टीम इंडिया (Team India) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 मधील दुसरा सामना मंगळवार, 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळणार आहे. कोलंबोमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील. पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज श्रीलंकाविरोधात रोहित शर्मा आणि टीम दोन हात करणार आहे. कोलंबोमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे भारतीय संघ लागोपाठ तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणार आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामळे झाला नव्हता. सोमवारी राखीव दिवशी हा सामना पूर्ण झाला. आता श्रीलंकाविरोधात दोन्ही संघ आमनेसामने असतील. 


श्रीलंकाविरोधात भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या बदलांचं सर्वात मोठं कारण म्हणजे, सलग दोन सामने खेळणं. कारण टीम इंडिया 11 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा सुपर-4 चा पहिला सामना संपवला, जो रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळला गेला. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना विश्रांती देण्याच्या दृष्टीनं प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात. श्रेयस अय्यर आजच्या सामन्यासाठीही उपलब्ध नाही. त्यामुळे इशान किशन अथवा केएल राहुल यांना आराम दिल्यास तिलक वर्मा अथवा सूर्यकुमार यादव याला संधी दिली जाऊ शकते. 


केएल राहुलला विश्रांती मिळू शकते, सूर्याला संधी मिळण्याची शक्यता 
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात दुखापतीनंतर केएल राहुलचं प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झालं. मैदानात पाकिस्तान विरोधात केएल राहुलनं धमाकेदार खेळी केली. आपल्या शानदार शतकी खेळीनं राहुलनं सर्वांचीच मनं जिंकली. राहुलनं 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 111* धावा केल्या. यानंतर त्यानं विकेटकीपिंगही केलं. 


काल रिझर्व्ह डेच्या दिवशी पाकिस्तान विरोधात सामना खेळल्यानंतर टीम इंडियाला आज पुन्हा श्रीलंकेविरोधात सामना खेळायचा आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजच्या सामन्यात केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याऐवजी सुर्यकुमार यादवला मिडल ऑर्डरमध्ये खेळवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत ईशान किशन विकेटकिपिंग करताना दिसेल. 


टीम इंडियात होऊ शकतात संभाव्य बदल 
केएल राहुल व्यतिरिक्त आजच्या सामन्यात टीम इंडियात इतर कोणत्याही बदलाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरोधात रोहित ब्रिगेड पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरुन श्रीलंकेचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच, आजच्या प्लेईंग इलेव्हनमधून स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही ब्रेक दिला जाऊ शकतो. तसेच, त्याच्याऐवजी मोहम्मद शामीला जागा दिली जाऊ शकते. पण, बुमराहला विश्रांती मिळेल असं वाटत नाही. कारण पुनरागमानानंतर बुमराह इतरही अनेक सामने खेळला आहे. 



भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाचा खोडा - 


आशिया चषकात भारताच्या प्रत्येक सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भारताचा प्रत्येक सामना प्रभावित झालाय. साखळी फेरीत पाकिस्तानविरोधीतील सामना रद्द करावा लागला होता. तर नेपाळविरोधातील सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमांनुसार लागला.  त्यानंतर सुपर ४ फेरीतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राखीव दिवशी सामना घ्यावा लागला होता. आता श्रीलंकेविरोधातील सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


आशिया चषकात टीम इंडियाचे शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा. 


श्रीलंका संघात कोण कोण ?


दासुन शनाका (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलागे, महेश थेकशाना, कासुन रजिता, मथीशा पथिराना, कुसल परेरा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन, दुशान हेमंथा. 



टीम इंडियाचा संभाव्य संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.