IND Vs NEP Live Score : भारताचा नेपाळवर 10 विकेटने विजय, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
Asia Cup 2023 Live : भारतासाठी आज करो आणि मरो असा सामना आहे. नेपळाविरोधात सामना भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागेल..
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली.रोहित शर्माने नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली.
भारताचा विजय दृष्टीक्षेपात.... विजयासाठी 10 धावांची गरज
रोहितपाठोपाठ गिलचेही अर्धशतक.... 47 चेंडूत ठोकले अर्धशतक
रोहित शर्माने 39 चेंडूत अर्धशतक ठोकले... भारत बिनबाद 96 धावा
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी वादळी फलंदाजी करत नेपाळची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि गिल यांनी बिनबाद 90 धावा केल्या आहेत
रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीने अर्धशतकी भागिदारी केली.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाच षटकात 31 धावाची सलामी दिली आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर.. पावसानंतर सामन्याला सुरुवात
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 23 षटकांचा सामना होणार आहे. आतापर्यंत 2.1 षटकांचा सामना झाला आहे. भारताने 17 धावा केल्या आहेत. भारताला 17.5 षटकांत आणखी 128 धावा करायच्या आहेत.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला आहे. खूप वेळापासून कँडीमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जर सामना सुरु झाला तर भारताला किती टार्गेट मिळणार.. याबाबतची चर्चा सुरु आहे. 45 षटकांचा सामना झाला तर भारताला 220 धावांचे आव्हान मिळाले. 40 षटकांचा सामना झाल्यास 207, 35 षटकांचा सामना झाल्यास 192 धावांचे आव्हान मिळेल. 30 षटकांचा सामना झाला तर 174 आणि 20 षटकांचा सामना झाला तर 130 धावांचे आव्हान मिळू शकते.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसाने प्रभावित झालाय.. प्रत्येक 4 मिनिटाला एक षटक कमी होणार
भारताची फलंदाजी सुरु झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. भारत बिनबाद 17 धावा
नेपाळने दिलेल्या 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि गिल यांनी दमदार सुरुवात केली.
230 धावसंख्येवर नेपाळचा डाव आटोपला.. सिराज-जाडेजाचा भेदक मारा
नेपाळला नववा धक्का बसलाय...
228 धावांवर नेपाळला आठवा धक्का बसला आहे. शामीच्या गोलंदाजीवर सोमपाल 48 धावा काढून बाद झाला.
नेपाळने 200 धावांचा टप्पा पार केला आहे.
हार्दिक पांड्याने नेपाळला सातवा धक्का दिला आहे. पावसानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर हार्दिक पांड्याने विकेट घेतली.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर पंचांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने 40 षटकात 6 बाद 186 धावा केल्या आहेत.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसाने खोडा घातल्यामुळे सामना थांबवावा लागला. खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. पाकिस्तानविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत नेपाळच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. चांगल्या सुरुवातीनंतर नेपाळची फलंदाजी ढेपाळली. नेपाळने सहा बाद 155 धावा केल्या आहेत. रविंद्र जाडेजाने तीन तर सिराजने एक विकेट घेतली.
रविंद्र जाडेजाने भारताला दुसरे यश मिळवून दिले... नेपाळने 77 धावांवर दुसरी विकेट गमावली.
लॉर्ड शार्दुल ठाकूर याने भारताला पहिले यश मिळवून दिले. 65 धावांवर नेपाळला पिहला धक्का बसला आहे. नेपाळने पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागिदारी करत दमदार सुरुवात केली
भारताच्या भेदक माऱ्यापुढे नेपाळच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. नेपाळच्या सालमी फलंदाजांनी एकही विकेट न गमावता अर्धशतकी भागिदारी केली आहे.. नेपाळने 9 षटकात बिनबाद 53 धावा चोपल्या आहेत. शामी, सिराज आणि हार्दिक पांड्या यांना विकेट घेता आली नाही.
नेपाळच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली आहे. 5 षटकात एकही विकेट न गमावता 23 धावा जोडल्या आहेत.
मोहम्मद शामी पहिले षटक घेऊन आलाय...नेपाळचे फलंदाजही सज्ज झालेत.
कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शारकी, सोमपाल कामी, गुलशन झा, दिपेंद्र सिंह अर्री, कुशप माला, संदीप लमिछाने, करन केसी, ललित राजबांसी.
पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
जसप्रीत बुमराह उपलब्ध नसल्यामुळे रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याला संधी दिली आहे. मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू असतील. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळतील.
Asia Cup 2023, IND Vs NEP Live Score : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे.
पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला.त्यामुळे भारताला एका गुणांवर समाधान मानावे लागले. आता आशिया चषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय गरजेचा आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ दोन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
पार्श्वभूमी
Asia Cup 2023, IND Vs NEP Live Updates : भारतीय संघ आशिया चषकातील आपला दुसरा सामना आज नेपाळविरोधात खेळत आहे. पाकिस्तानविरोधात झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य झाला आहे. नेपाळच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला सुरुवाता चांगलेच झुंजवले होते. त्यामुळे रोहित अॅण्ड कंपनी नेपाळला हलक्यात घेणार नाही. पाकिस्तानविरोधात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, गिल आणि अय्यर यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याशिवाय रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरही प्रभावी कामगिरी करु शकले नव्हते. आजच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, त्यावर स्पर्धेतील आव्हान ठरणार आहे.
भारताला झटका, बुमराह नेपाळविरोधात अनुपलब्ध
दरम्यान, या सामन्याच्या आधी भारताला मोठ झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नेपाळविरुद्धच्या सामान्यात खेळू शकणार नाही. तो स्पर्धेच्या मध्यातूनच मायदेशात परतला आहे. जसप्रीस बुमराह बाबा बनला आहे. त्याची पत्नी संजना गणेशनने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळेच बुमराह भारतात परत आला असल्याचं समजतं. तत्पूर्वी बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली आहे.
आशिया चषकात एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत आणि ते दोन ग्रुपमध्ये विभागले आहेत. पुढील फेरीत दोन्ही ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघांनाच जागा मिळणार आहे. भारताकडे सध्या एक गुण आहे. तर पाकिस्तान तीन गुणांसह पुढील फेरीत दाखल झाला आहे. तर भारताविरुद्धचा आजचा सामना नेपाळने जिंकला तर संघाच्या खात्यात दोन गुण जमा होतील आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडेल. मात्र नेपाळसारख्या कमकुवत संघाला भारतीय संघ सहजरित्या पराभूत करेल, अशी अपेक्षा आहे.
भारताने नाणेफेक जिंकली -
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -