England vs Australia 2nd Test : अॅशेस  मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 43 धावांनी विजय मिळवला आहे. बेन स्टोक्स याची 155 धावांची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली. लॉर्ड्स कसोटीत बाजी मारत ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. 371 धावांचा पाठलाग करताना बेन स्टोक्स याने 155 धावांची धुवांधार खेळी केली. पण तो इंग्लंडला विजय मिळून देण्यात अपयश आले.  


ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडने 325 धावांपर्यंत मजल मारली. पण दुसऱ्या डावात इंग्लंडने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला 279 धावंत रोखले. इंग्लंडला लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी 371 धावांचे आव्हान मिळाले होते. यजमना इंग्लंड संघाने 327 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार बेन स्टोक्स याने एकाकी झुंज देत 155 धावांची खेळी केली. पण इंग्लंडला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 43 धावांनी पराभव केला.  बेन स्टोक्स याच्या वादळी फलंदाजीचे क्रीडा विश्वातून कौतुक होत आहे. विराट कोहली, केएल राहुल याच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी स्टोक्सच्या झंझावती खेळीचे कौतुक केले आहे. 






इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान - 


दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लंडने 279 धावांत रोखले होते. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान मिळाले. इंग्लंडसाठी बेन डकेट याने 83 आणि बेन स्टोक्स याने 155 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, परिणामी इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. 






जॅक क्रॉली 03, ओली पोप 03, जो रूट 18 आणि हॅरी ब्रूक 04 यांना मोठी खेळी करता आली नाही. 45 धावांत इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते.  त्यानंतर बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांनी 132 धावांची भागिदारी केली.  डकेट याने 112 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 83 धावांची खेळी केली. त्यानंतर जॉनी बेयरस्टो 10 धावांवर धावबाद झाला.  बेयरस्टो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स याने आक्रमक फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. स्टोक्सने 214 चेंडूत 9 चौकार आणि 9 षटकांच्या मदतीने 155 धावांची खेळी केली. बेन स्टोक्सने स्टुअर्ट ब्रॉडसोबत 109 धावांची भागिदारी केली. ब्रॉड 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर ओली रॉबिन्सनही 1 धावेवर बाद झाला.