World Cup 2023, Arshdeep Singh : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला तीन ते चार महिन्याचा कालावधी बाकी आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची बांधणी सुरु झाली आहे. भारतीय संघ काही युवा खेळाडूंना संधी देत आहेत. भारतीय संघाच्या वर्ल्ड कप प्लॅनमधून अर्शदीप सिंह याचा समावेश नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, आगामी महिन्यात होणाऱ्या विंडिज दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात अर्शदीपला स्थान मिळाले नाही. मुकेश कुमार आणि उमरान मलिक या युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलेय. पण अर्शदीप याची निवड झाली नाही, त्यामुळे तो विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या प्लॅनचा भाग आहे की नाही ? याची जोरदार चर्चा रंगली आहे.
2022 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात अर्धशतीप सिंह टीम इंडियाचा सदस्य होता. पण भारतात होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये अर्शदीप भारताचा भाग नाही का ? असा प्रश्न विचारला जातोय. कारण वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात उमरान मलिक आणि मुकेश कुमार या युवा गोलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय युवा ऋतुराज गायकवाड यालाही संधी दिली आहे.
अर्शदीप सिंह याने आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत, यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये अर्शदीप याने अखेरचा वनडे सामना केळला आहे. फेब्रुवारी 2023 नंतर अर्शदीप याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अर्शदीप लाइन लेन्थवर संघर्ष करत असल्याचे दिसतेय. यामध्ये त्याने काही नो बॉल फेकले आहेत. आयपीएलमध्येही अर्शदीप याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर