मुंबई : एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) धमाका केलाय. नुकतेच झालेल्या ट्रेड डीलमध्ये अर्शदीपने पंजाबची साथ सोडून मुंबई इंडियन्ससोबत (MI) आयपीएलसाठी साठगाठ बांधली आहे. मात्र, अर्शदीपने आता आयुष्याची देखील लग्नगाठ बांधल्याचं दिसून आलं. अर्शदीपने बुधवार 11 नोव्हेंबर रोजी त्याची मैत्रीण समरीनसोबत साखरपुडा केला असून त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अर्शदीपने फिल्मीस्टाईलने गुडघ्यावर बसून समरीनच्या बोटात अंगठी घातली, सध्या या जोडीच्या हटके आणि सिनेस्टाईल अंदाजाचे फोटो व्हायरल झाले आहेत. मुंबई इंडियन्सनेही अर्शदीप-समरीनच्या जोडीचे फोटो शेअर करत, अर्शदीपसाठी आजची तारीख 11-11-27 ही खरंच खास आहे. अभिनंदन अर्शदीप आणि समीरन... असे एमआयने ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे. दरम्यान, अर्शदीप आणि समरीनला चाहत्यांकडून शुभेच्छाद दिल्या जात आहेत. तर, क्रिकेट क्षेत्रातील मित्रमंडळी आणि दिग्गजांकडूनही दोघांचे अभिनंदन केले जात आहे.
अर्शदीप आणि समरीन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले की, ‘आयुष्य जे काही देऊ शकतं, त्यापैकी सर्वात मोठा आनंद याच गोष्टीचा आहे की, त्याने आपल्याला एकमेकांची साथ दिली. आयुष्यभराच्या या सहप्रवासाच्या नावाने... ११.११.२०२६ (हॅपी एंगेजमेंट!).’ अशी इंस्टा पोस्ट अर्शदीपने केली आहे. दरम्यान, अर्शदीप आणि समरीन दोघेही गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र आहेत, समरीन ही पंजाबी सिनेक्षेत्रात असून ती अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसून आली आहे. बॉलिवूडच्या '83' या कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारीत 1983 च्या वर्ल्डकपाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमातही ती झळकली होती.
