Arjun Tendulkar News : ‘क्रिकेटचे देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल 2026 सुरू असतानाच अर्जुन दुसऱ्या लीगमध्ये खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग असला तरी या हंगामात त्याला अद्याप एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.

Continues below advertisement

BCCIकडून पण मिळाली परवानगी

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला टी20 मुंबई लीगच्या चौथ्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावासाठी पात्र घोषित केले आहे. त्यामुळे अर्जुनला आता या लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Continues below advertisement

गोव्याच्या संघाकडून रणजी खेळतो, तरी टी20 मुंबई लीगमध्ये खेळण्याची परवानगी?

अर्जुन याआधी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. मात्र, आता त्याने गोव्याचा संघ निवडला असून सध्या तो गोव्याच्या संघाकडून रणजी आणि इतर स्पर्धांमध्ये खेळतो. त्याच्या या बदलानंतरही बीसीसीआयने त्याला टी20 मुंबई लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. कारण गेल्या 12 महिन्यांत अर्जुनने कोणत्याही इतर राज्य संघाच्या टी20 लीगमध्ये भाग घेतलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांसाठी खेळाडूंचा लिलाव 2 मे रोजी होणार आहे. तर ही टी20 मुंबई लीग जूनच्या पहिल्या पंधरवड्यात खेळवली जाणार आहे.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, खेळाडूंवर अतिरिक्त शारीरिक ताण येऊ नये आणि त्यांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी एका 12 महिन्यांच्या कालावधीत (IPL वगळता) फक्त एका अधिकृत टी20 लीगमध्येच खेळण्याची परवानगी दिली जाते. हा कालावधी त्या खेळाडूने शेवटची स्पर्धा खेळलेल्या तारखेपासून मोजला जातो. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूने 31 ऑगस्ट 2024 रोजी संपलेल्या राज्य संघाच्या टी20 स्पर्धेत भाग घेतला असेल, तर त्याला 1 सप्टेंबर 2025 पर्यंत दुसऱ्या कोणत्याही राज्य संघाच्या टी20 स्पर्धेत खेळता येत नाही.

अर्जुन तेंडुलकरने गेल्या 12 महिन्यांत अशा कोणत्याही राज्यस्तरीय टी20 लीगमध्ये सहभाग घेतलेला नसल्याने तो या निकषांमध्ये बसतो. सध्या तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे, तर रणजी ट्रॉफीत गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे आता टी20 मुंबई लीगमध्ये त्याची कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 हे ही वाचा -

RS Ambrish SRH IPL 2026 : काव्या मारनची मोठी खेळी! भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला अचानक घेतले ताफ्यात, कोण आहे तो? ज्याच्यासाठी मोजले लाखो रुपये