Arjun Tendulkar Debut For Lsg IPL 2026 : क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या आडनावांपैकी एक... पण त्याच नावामुळे सतत प्रचंड दबाव सहन करणारा अर्जुन तेंडुलकर अखेर आयपीएलच्या रंगमंचावर नव्या जर्सीत उतरला. पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी देत मोठा विश्वास दाखवला. लखनऊ सुपर जायंट्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी संघ व्यवस्थापनाने भविष्यासाठी मोठे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो अर्जुन तेंडुलकरचा समावेश. अनेक वर्षे सचिनचा मुलगा या टॅगखाली वावरणाऱ्या अर्जुनने शांतपणे मेहनत सुरू ठेवली आणि अखेर त्याच्या संघर्षाला फळ मिळालं.

Continues below advertisement

श्रेयस अय्यरने जिंकला टॉस (Lsg Vs Pbks Ipl 2026)

‘करो या मरो’ सामन्यात पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. पंजाबसाठी हा सामना जिंकाला नाही, तर ते थेट बाहेर होतील. त्यामुळे प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. आज दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले असून अर्जुन तेंडुलकरला लखनऊकडून पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

टॉसनंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला?

“आम्ही प्रथम गोलंदाजी करू. संघात दोन बदल केले आहेत. मार्को यानसेन आणि विजयकुमार वैशाक पुनरागमन करत आहेत. संघातील वातावरण खूप चांगल आहे. आमच्यासाठी हा करो किंवा मरो सामना आहे. याआधी आम्ही अशा परिस्थितीत नव्हतो, पण प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम देण्यासाठी सज्ज आहे,” असे श्रेयस अय्यर म्हणाला.

टॉसनंतर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत काय म्हणाला?

“आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. ही विकेट फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांसाठीही चांगली आहे. हा हाय-स्कोअरिंग सामना होऊ शकतो. आम्ही दोन बदल केले असून अर्जुन तेंडुलकर आणि अर्शिन कुलकर्णी संघात आले आहेत. हा हंगाम आमच्यासाठी कठीण राहिला, पण आम्हाला संघ म्हणून आणि वैयक्तिक पातळीवर खूप शिकायला मिळाले. उत्तर प्रदेशभरातून आलेल्या चाहत्यांची मी माफी मागतो. काळ कठीण आहे, पण आज आम्ही 100 टक्के देऊ,” असे ऋषभ पंत म्हणाला.

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसेन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन : जॉश इंग्लिस, अर्शिन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, मुकुल चौधरी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसिन खान.

हे ही वाचा -

IPL 2026 Playoff Scenarios : फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण