IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना रोमांचक झाला. सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली.
बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल आता सुपरओव्हरमध्ये लागेल. सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर होईल.
सुपर ओव्हरमध्ये काय झालं ?
अफगानिस्तानकडून गुरबाज आणि नायब गुलबदीन सलामीला आले होते. भारताकडून मुकेश कुमार यानं षटक टाकलं. अफगाणिस्तान संघाने सुपरओव्हरमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात 16 धावा काढल्या.
01 - मुकेश कुमारच्या चेंडूवर गुलबदीन याने लाँग ऑनला फटका मारला. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात गुलबदीन बाद झाला. विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे पहिल्याच चेंडूवर गुलबदीन याने विकेट फेकली.
0.2- मोहम्मद नबी याने मुकेश कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली.
0.3 - गुरबाज याने मुकेश कुमारचा चेंडूवर चौकार लगावला.
0.4. गुरबाज याने मुकेश कुमारच्या चेंडूवर एक धाव घेतली.
0.5 - मोहम्मद नबी याने मुकेश कुमारचा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवत सहा धावा वसूल केल्या.
0.6. मुकेश कुमार याने नबीला अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. संजू सॅमसन याने टाकलेला थ्रो मुकेश कुमार याला अडवता आला नाही. नबी आणि गुरबाज यांनी तीन धावा काढल्या. अफागणिस्तान संघाने बायच्या रुपात तीन धावा काढल्या.
भारताला विजयासाठी अफगाणिस्तानकडून 17 धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजई याने गोलंदाजी केली.
0.1 - अजमतुल्लाह उमरजई याने रोहित शर्माला चेंडू फेकला. या चेंडूवर रोहित शर्मा याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण फसला तरी रोहित आणि यशस्वी जायस्वाल यांनी एक चोरटी धाव घेतली.
0.2 - अजमतुल्लाह उमरजई याने अतिशय चुताराईने गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला फक्त एक धाव घेता आली.
0.3 - रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार मारला. भारताची धावसंख्या 3 चेंडू 8 धावा.... भारताला विजयासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज
0.4 - रोहित शर्माने चौथ्या चेंडूवरही ऑफसाईडला कव्हरवरुन जबरदस्त षटकार मारला. भारताने चार चेंडूत 14 धावा केल्या. भारताला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज
0.5 - अजमतुल्लाह उमरजई याच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव काढली. आता भारताला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची गरज (रोहित शर्मा रिटायरहर्ट होऊन तंबूत परतला)
0.6 - अखेरच्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला एक धाव काढता आली. सुपर ओव्हरही टाय झाली.