मुंबई : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन टीम इंडियामध्ये (Team India) पदार्पण करणाऱ्या सरफराज खान( Sarfaraz Khan) याच्या वडिलांना थार कार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती.आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवला आहे. आनंद महिंद्रांकडून सरफराज खान याचे वडील नौशाद खान(Naushad Khan) यांना थार कार भेट देण्यात आली आहे. 


आनंद महिंद्रा यांनी 16 फेब्रुवारीला सरफराज खान याच्या टीम इंडियातील कसोटीतील पदार्पणावेळी मोठी घोषणा केली होत सरफराज खान याच्या वडिलांचं कौतक करताना आनंद महिंद्रांनी मोठी घोषणा केली होती. नौशाद खान यांनी थार कार गिफ्ट स्वीकारली तर आनंद होईल, असं आनंद महिंद्रांनी म्हटलं होतं. 





आनंद महिंद्रांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी सरफराज खान याच्या कसोटीतील पदार्पणानंतर नौशाद खान यांचं कौतुक केलं होतं.नौशाद यांनी दाखवलेलं कठोर परिश्रम, धाडस आणि संयम महत्त्वाचा आहे. नौशाद यांनी त्यांच्या मुलांचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नौशाद यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा होता, असं आनंद महिंद्रा म्हणाले. 


हिम्मत सोडू नका, कठोर परिश्रम, धाडस आणि संयम आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे दुसऱ्या कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे. 


सरफराज खानची कारकीर्द 


सरफराज खान यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कामगिरी चांगली कामगिरी केल्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत सरफराज खाननं पदार्पण केलं होतं. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू माजी कसोटीपटू फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याच्या हस्ते टीम इंडियाची कॅप देऊन स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी सरफराज खान याचे वडील नौशाद खान देखील मैदानावर उपस्थित होते. सरफराज खान यानं त्या कसोटीत पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या होत्या.   
  
सरफराज खान  यानं इंग्लंड विरुद्ध तीन कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये पाच डावात त्यानं 50 च्या सरासरीनं 200 धावा केल्या आहेत. सरफराजचं स्ट्राइक रेट 79.36 इतकं आहे. सरफराजच्या नावावर तीन कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतकं आहेत. नाबाद 68 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सरफराज खान शिवाय त्याचा भाऊ मुशीर खान देखील क्रिकेट खेळतो. नुकत्याच झालेल्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुशीर खाननं विदर्भाच्या संघा विरोधात शतक झळकावलं होतं. मुंबईनं विदर्भ संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. त्यामध्ये मुशीर खानची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.  
      
संबंधित बातम्या :


CSK vs RCB Score Live IPL 2024: 'माही' मैदानाबाहेर चेंडू टोलावणार, किंग कोहली सलामीला येणार; CSK-RCB आज भिडणार


आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या....