Amol Muzumdar World cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत नवा इतिहास रचला. यापूर्वी भारतीय महिला संघाला (Team India) दोनवेळा अंतिम फेरीत जाऊनही विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, रविवारी भारताच्या महिला संघाने अंतिम सामना जिंकून विश्वचषकावर (Women World Cup 2025) कब्जा केला. टीम इंडियाच्या या यशात खेळाडूंच्या योगदानाबरोबर प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली. मुझुमदार यांच्या मार्गदर्शनामुळे सुरुवातीच्या फेरीत तीन सामने हरल्यानंतरही भारतीय संघाने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात आपली कामगिरी उंचावली होती. (ICC Womens World Cup 2025)

Continues below advertisement

अमोल मुझुमदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा रतीब पाडूनही त्यांना एकदाही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदार या नावाभोवती प्रचंड वलय असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी एकदाही मिळाली नव्हती. ही एकप्रकारची शोकांतिकाच होती. मात्र, रविवारी भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर अमोल मुझुमदार यांच्या बावनकशी प्रतिभेला नियतीने एका वेगळ्याच मार्गाने न्याय दिल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली. अमोल मुझुमदार यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय महिला संघ बांधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. यापूर्वी भारतीय संघाचा अंतिम सामन्यात दोनवेळा पराभव झाला होता. त्यामुळे अमोल मुझुमदार यांनी वर्ल्डकपच्या फायनलपूर्वी भारतीय संघात चैतन्य फुंकण्यासाठी मैदानात एक छोटेखानी भाषण दिले. या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे भाषण प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करणारे आहे.

Women Team India: अमोल मुझुमदार यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटलं?

पुढील सात तास, तुमच्या मनातील सगळा गोंधळ दूर ठेवा. सगळ्या जगाशी संपर्क तोडून स्वत:भोवती एक वर्तुळ (Bubble) तयार करा. तुम्हाला या बबलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि सगळं संपवूनच बाहेर यायचं आहे. आज आपण स्वत:ची कहाणी लिहणार आहोत. इथून पुढे दुसऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकायच्या नाहीत. आज रात्री तुम्ही सगळेजण स्वत:ची कहाणी तुमच्याच हातांनी लिहणार आहात. पुढील तास तास तुम्हाला त्याच वर्तुळात राहायचं आहे. चला इतिहास घडवुया.

Continues below advertisement

आणखी वाचा

'बायकोला सांगून ठेवलं होतं, इकडे काय घडतंय ते मला अजिबात सांगू नकोस'; पार्ल्यातील घरी आल्यावर अमोल मुझुमदारांनी सांगितलं 'ते' सिक्रेट