Australia vs India 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या म्हणजेच 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या सध्याच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेत भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला मालिका गमावण्याचा धोका आहे. दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज आकाशदीपला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे तो सिडनी कसोटीतून बाहेर जाऊ शकते.






आकाश दीपच्या पाठीला झाली दुखापत 


इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज आकाशदीप पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. यामुळे तो शेवटच्या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. मेलबर्न कसोटीत त्याने एकूण 43 षटके टाकली हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दरम्यान, त्याला केवळ दोन विकेट घेता आल्या. दीपबाबत तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवला तर त्याने सामन्यादरम्यान चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र त्याला फारसे यश मिळवण्यात अपयश आले आहे.






हर्षित राणाला मिळणार संधी!


आकाश दीपच्या दुखापतीनंतर हर्षित राणाला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यात चांगली गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.  


ऋषभ पंत होणार बाहेर?


मेलबर्न कसोटीत चाहत्यांना पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण त्याने खराब शॉट्स खेळून विकेट गमावली. ज्यानंतर त्याला फटकारल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एवढेच नाही तर वृत्तांवर विश्वास ठेवला तर सध्याच्या सर्वोत्तम यष्टिरक्षक खेळाडूला पुढील सामन्यातून बाहेर ठेवण्याची योजनाही आखली जात आहे. याशिवाय त्याच्या जागी ध्रुव जुरेलचा संघात समावेश झाल्याची चर्चा आहे. ज्युरेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय अ संघाचा भाग होता. रांची कसोटीत त्याने इंग्लंडविरुद्ध ज्या प्रकारे 90 धावांची खेळी खेळली. सगळेच त्यांचे चाहते झाले.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.


हे ही वाचा -


Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री