Continues below advertisement

मुंबई : भारताचा संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अजित आगरकरनं संघ जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या निवड समितीनं 2027 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत शुभमन गिलवर संघाची जबाबदारी सोपवली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली शुभमन गिलच्या नेतृत्त्वात खेळतील. याच पत्रकार परिषदेत अजित आगरकरनं रोहित शर्मा आणि विराट कोहली संदर्भात एक वक्तव्य केलं ज्यानं या दोघांच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

Ajit Agarkar on Rohit Sharma and Virat Kohli : अजित आगरकर विराट कोहली अन् रोहित शर्माबाबत काय म्हटलं?

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमधील सहभागाबद्दल भाष्य केलं. अजित आगरकरनं स्पष्ट केलं की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वर्ल्ड 2027 चा वर्ल्ड कप खेळण्यासंदर्भात नॉन कमिटेड आहेत. आगरकरच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळणार की नाही याबाबत चाहत्यांमध्ये तर्क वितर्क सुरु झाले आहेत. दोघांच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्का मानला जातोय.

Continues below advertisement

अजित आगरकरनं म्हटलं की रोहित शर्मा आणि विराट कोहलीला अगोदरच संदेश देण्यात आला होता, त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावं. अजित आगरकरनं रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टीम इंडियाला मार्गदर्शन करत असल्याबद्दल आभार मानले आहेत. ते दोघे कित्येक वर्षापासून टीम इंडियाला मार्गदर्शन करत आले आहेत. ड्रेसिंग रुममध्ये अजूनही ते लीडर आहेत. ते या फॉरमॅटमध्ये यशस्वी ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम निवडण्यात आली आहे, तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही, असं अजित आगरकरनं म्हटलं.

वनडेसाठी भारताचा संघ

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

वनडे मालिकेचं वेळापत्रक

19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)

23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)

25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)