मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं वनडे आणि टी 20 चा संघ जाहीर केला आहे. वनडे संघाचं नेतृत्व आता शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याच्या नेतृत्त्वात खेळतील. टी 20 संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. उपकप्तान म्हणून शुभमन गिलकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघात नसेल. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला टी 20 संघात स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्याला वनडे च्या संघात देखील स्थान देण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डीला लॉटरी

बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळं आशिया कपच्या फायनलमध्ये खेळू शकला नव्हता. तो बंगळुरुत सीओई मध्ये दाखल होईल त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती मिळेल, असं अजित आगरकर यानं म्हटलं. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

नितीश कुमार रेड्डीवर निवड समितीनं विश्वास दाखवला आहे. सध्या तो भारताच्या कसोटी संघात देखील खेळतोय. विशेष बाब म्हणजे टी 20 च्या संघात नितीशकुमार रेड्डीला संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणं त्याला वनडे मालिकेत देखील स्थान मिळालं आहे.काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये नितीशकुमार रेड्डीनं 298 धावा केल्या होत्या. याशिवाय त्यानं 5 विकेट देखील घेतल्या होत्या. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर त्यानं 114 धावांची खेळी केली होती. 

Continues below advertisement

नितीशकुमार रेड्डीनं गेल्या वर्षी बांग्लादेश विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आता भारताच्या तिन्ही संघात खेळणाऱ्या काही खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. शुभमन गिल,कुलदीप यादव यासह इतर खेळाडू तिन्ही संघात आहेत.  

ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार,तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी,शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यांचं वेळापत्रक

29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)